ETV Bharat / state

Kolhapur Accident : शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर पलटी; काही क्षणातच नागरिकांकडून कंटेनर रिकामा

author img

By

Published : Feb 4, 2023, 2:43 PM IST

गोव्याच्या दिशेने शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर पुईखडीच्या घाटात उलटला. हे पाहताच शीतपेयाच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. घटनेची नोंद कोल्हापूरातील करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Kolhapur Accident
शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर पलटी

शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर पलटी

कोल्हापूर : गोव्याच्या दिशेने शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर आज पहाटेच्या सुमारास पुईखडीच्या घाटात उलटल्याची घटना घडली. कंटेनर उलटल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अक्षरशः कंटेनर लुटून नेल्याचे पाहायला मिळाले. दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांनी सुद्धा गाड्या थांबवून शीतपेय बॉटल उचलल्या. ही घटना करवीर तालुक्यातील पिराचीवाडी परिसरात घडली.

तासाभरात कंटेनर केला रिकामा : आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूरातून गोव्याकडे जाणारा शीतपेयाचा कंटेनर अचानक पालटी झाला. अंधार असल्याने पहाटे कोणी जास्त लक्ष दिले नाही. मात्र सकाळ होताच एक एक करत अनेकांनी कंटेनरमधील शीतपेय बॉटल पळवायला सुरुवात केली. यामध्ये दुचाकी चालकांसह चारचाकी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बघता बघता तासाभरात संपूर्ण कंटेनर नागरिकांनी रिकामा केला. या घटनेची नोंद कोल्हापूरातील करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीवर थरावर थर लावून बॉटल पळवल्या : आज सकाळी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची गाडीतील बाटल्या नेण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. काही दुचाकीचालकांनी तर आपल्या गाडीवर एकावर एक थर लावून नेता येत नव्हते तरीही बॉटल पळवल्या. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरतात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती.

यापूर्वी अशाच पद्धतीने कंटेनर लुटले : कोल्हापूरमध्ये यापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीने अनेक कंटेनर पलटी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये माशांचा कंटेनर तसेच दारूच्या कंटेनरचा सुद्धा समावेश होता. काही वेळा तर कंटेनर चालक आणि नागरिकांमध्ये वादावादीचे सुद्धा प्रकार घडले आहेत. दारूचा कंटेनर पलटी झाल्याच्या सुद्धा अनेक नोंदी आहेत त्यामध्ये नागरिक अक्षरशः पोती भरून बॉटल घेऊन जाताना पाहायला मिळाले आहेत. आज सुद्धा पुईखडी येथे शीतपेय कंटेनर पटली झाल्याचे पाहताच नागरिकांनी अक्षरशः तो लुटून तासाभरात मोकळा केला.

करवीर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद : या अपघाताची करवीर पोलीसांत नोंद झाली आहे. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी कंटेनर मोकळा केला होता. नागरिक गाड्या अक्षरशः बाजूला लावून शीतपेय चे बॉक्स लुटत होते. यावेळी चालक सुद्धा गर्दी पाहून कोणालाच विरोध करू शकला नाही.

हेही वाचा :Nanded Accident: एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; ९ प्रवाशी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.