ETV Bharat / state

ऊसदर आंदोलनात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मनोज जरांगे पाटील

CM Eknath Shinde Kolhapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी सहपत्नी कोल्हापुरात आले होते. यावेळी राज्यात सुख, शांती नांदू दे, शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री शिंदे यांनी अंबाबाई (kolhapur Ambabai) चरणी केली. तसेच शासन ऊस दर आंदोलनात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 8:49 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर CM Eknath Shinde Kolhapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन (Karveer Nivasini Ambabai) घेतलं. राज्यातील सरकार शेतकऱ्यांचं आहे. साखर कारखान्यांच्या नफ्यातील वाटणीनुसार शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत. ऊस दर आंदोलनात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे. शेतकऱ्याचं हित हेच सरकारचं धोरण आहे. ऊस दर आंदोलनात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. कोल्हापुरात अंबाबाई दर्शनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

शेतकरी हित पाहणारं सरकार : राज्य सरकारने केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदे बाजूला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केलं आहे. नैसर्गिक संकटातही राज्यातील शेतकऱ्याला सरकारने मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्याला सरकारने एक रुपयात पिक विमा देऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी हित पाहणारं हे सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यासाठी राज्यभरात कुणबी नोंदी एकत्र करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांचा विरोध नाही : आज ठाण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा होत आहे. याबाबत विचारले असता, जरांगे पाटील माझ्या विरोधात सभा घेत नाहीत. त्यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी राज्यभर दौरे केले आहेत. आता ते त्यासाठीच प्रयत्न करत आहेत. ठाण्यात सभा घेतली म्हणून मला विरोध आहे असा त्याचा अर्थ होत नाही, असा खुलासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

हेही वाचा -

  1. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची २०१२ मधील गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
  2. ऊसदर आंदोलनावर बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ; राजू शेट्टींचं आंदोलन सुरूच राहणार
  3. जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी अखेर फुटली, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.