ETV Bharat / state

Kolhapur Shahu Mill : राजर्षी शाहूंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम - कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावार स्वच्छता मोहीम

आज रविवारी स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Cleaning By Kolhapur Collector ) यांनी हातात झाडू घेत कोल्हापूरातील 'शाहू मिल' मधील ( Kolhapur Shahu Mill ) स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शिवाय शाहूंचा कार्याचा वारसा आपण जपला पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Kolhapur Shahu Mill
Kolhapur Shahu Mill
author img

By

Published : Apr 3, 2022, 9:48 PM IST

कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या ( Shahu Maharaj ) स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वात जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवाय विविध उपक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज रविवारी स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Kolhapur Collector Cleaning Champaign ) यांनी हातात झाडू घेत कोल्हापूरातील 'शाहू मिल' मधील ( Kolhapur Shahu Mill ) स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शिवाय शाहूंचा कार्याचा वारसा आपण जपला पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले.

प्रतिक्रिया

'शाहूंच्या कार्याला नमन करूया'- शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पुन्हा एकदा सर्वांसमोर आण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शाहू महाराजांनी सुरु केलेली ही पहिली कापड मिल आहे. कापड व्यवसायाच्या इतिहासामध्ये या मिलचे नाव आजही आदराने घेतले जाते. शाहू मिलचा परिसर मोठा असून फार कमी लोकांनी या मिलमध्ये प्रवेश केला आहे. या मिलच्या आवारात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील कार्यक्रम घेतले जाणार आहेत. राज्य शासनानेही मिलमध्ये कृतज्ञता पर्वातील कार्यक्रम घेण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे कार्यक्रमापूर्वी मिल आणि परिसराची स्वच्छता होणे गरजेचे आहे. यासाठी आज ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे. स्वच्छतेचे काम संपेपर्यत मोहिम राबविली जाणार असून स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला नमन करुया, असे अवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

'अनेकांना पहिल्यांदाच शाहू मिल पाहता येणार' - दरम्यान, अनेकांना पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहू मिल पाहता येणार आहे. तसेच मिल मध्ये प्रवेश मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिल बंद असल्याने मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली होती त्याची स्वच्छता सुरू आहे. पुढचे काही दिवस स्वच्छतेचे काम असेच सुरू राहणार आहे. दरम्यान, शाहू मिल स्वच्छता समजताच अनेक मिल मधील पूर्वीचे कामगार सुद्धा स्वच्छतेसाठी हजर झाले होते. शिवाय याठिकाणी शाहू महाराजांच्या कृतीचा वारसा असाच जपला जावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन आणि हजारो हात एकत्र - 18 एप्रिल ते 22 मे 2022 या काळात राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व संपन्न होणार आहे. या निमित्ताने आज शाहू मिलमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नागरिकांना सुद्धा सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक हात आज एकवटले. यामध्ये विशेष करून हिल रायडर्स, ॲडव्हेंचर फौंडेशन, मावळा ग्रुप, सार्तक क्रीयशन, हॉटेल मालक संघटना, वृक्ष प्रेमी संघटना, जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे कर्मचारी, मिल कॉलनीतील नागरीक, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह कोल्हापूर शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, शाहूप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याने त्यांचे कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरुन घसरले; 6 जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.