ETV Bharat / state

Shiwaji Maharaj Jayanti 2022 : कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवरायांचे मंदिर; साजरी होते शाही शिवजयंती

कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरच्या अगदी शेजारील सोन्या मारुती मंदिर चौकासमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बनवलेली नर्सरी बाग आहे. या बागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर कोरीव दगडांमध्ये दुमजली मंदिर सुद्धा त्यांनी बनवले. याच बागेच्या परिसरात तारा राणींचे आणि संभाजी महाराजांचेही मंदिर आहे.

शिवरायांचे मंदिर
शिवरायांचे मंदिर
author img

By

Published : Feb 19, 2022, 7:21 AM IST

कोल्हापूर - आजही कोल्हापुरातील अनेकांना नर्सरी बाग येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक मंदिराबाबत माहिती नाही आहे. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या परिसरात शिवरायांचे मंदिर बांधले होते. दरवर्षी मोठ्या उत्साहात याठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. अगदी छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत याठिकाणी शिवजयंती सोहळा पार पडत असतो. नेमकं कुठे आहे मंदिर? आणि काय आहे यामागे इतिहास पाहुयात, ईटीव्ही भारतच्या या विशेष रिपोर्टमधून...

कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवरायांचे मंदिर

1917 साली निर्मिती -

कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरच्या अगदी शेजारील सोन्या मारुती मंदिर चौकासमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बनवलेली नर्सरी बाग आहे. विशेष म्हणजे या बागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर कोरीव दगडांमध्ये दुमजली मंदिर सुद्धा त्यांनी बनवले. याच बागेच्या परिसरात तारा राणींचे आणि संभाजी महाराजांचेही मंदिर आहे. शिवाय राजघराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या समाधी आहेत. जवळपास 100 वर्षांपूर्वी बनवलेली ही सुंदर मंदिरं आजही सुस्थितीत आहेत. मात्र काही वर्षांपासून या नर्सरी बागेकडे दुर्लक्ष झाले होते. नुकतेच या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुंदर समाधी स्मारक बनले आहे. शिवाय परिसरात लॉन लावण्यात आला असून नर्सरी बागेच्या या परिसराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली असून बागेचे रुपडे पालटले आहे. याच परिसरात राजर्षी शाहू महाराजांनी बनवलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात दरवर्षी शिवजयंती थाटात साजरी होती.

कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवरायांचे मंदिर
कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवरायांचे मंदिर

अशी साजरी होते शिवजयंती -

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या नर्सरी बागेत मंदिर बांधले. त्यानंतर दरवर्षी याठिकाणी छत्रपती घराण्याच्या माध्यमातून अगदी थाटात शिवजयंती साजरी होऊ लागली. पारंपारिक रीतीरिवाजात आजही ही शिवजयंती साजरी होते. ऐतिहासिक भवानी मंडप येथून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून पारंपरिक लावजम्यासह नर्सरी बागेपर्यंत मिरवणूक काढण्यात येते. शिवाय छत्रपती घराण्यातील सदस्य सुद्धा या सोहळ्याला लावजम्यासह उपस्थित राहतात. यावेळी त्यांच्या उपस्थितीत शिव जन्मकाळ सोहळा पार पडतो. या मंदिर परिसरात भव्य शामियाना उभारण्यात येतो. याठिकाणी पोवाड्यांचा कार्यक्रम तसेच मर्दानी खेळ सुद्धा सादर होतात. छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत साजरी होणारी शिवजयंती पाहण्यासाठी कोल्हापूरातील अनेक लोकं इथं उपस्थित असतात. शंभर वर्षानंतर आजही कोल्हापूरातील छत्रपती घराण्याने ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे.

घाटगे कुटुंब करतात देखभाल -

संस्थान काळापासून येथील घाटगे कुटुंबाकडे या नर्सरी बागेतील सर्व मंदिरांची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर मंदिरातील पूजा नित्यनेमाने आजपर्यंत सुरू आहे. सध्या या मंदिरातील पूजा आणि इतर विधी दिलीप घाटगे यांच्याकडे याची जबाबदारी आहे. मात्र म्हणावे तसे पर्यटक या परिसरात येत नसल्याचे ते सांगतात. परिसर अतिशय ऐतिहासिक असून याठिकाणी प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.