ETV Bharat / state

गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

वादग्रस्त वक्तव्य करणारे पडळकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज दिली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

chandrakant patil comment on gopichand padalkar statement in kolhapur
गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
author img

By

Published : Jun 25, 2020, 5:09 PM IST

Updated : Jun 25, 2020, 6:24 PM IST

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. या टीकेनंतर संपूर्ण राज्यात या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. याबाबत भाजपने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे पडळकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज दिली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (बुधुवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलने पुकारली. यावेळी गेल्या 24 तासात भाजपकडून अधिकृत कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली. आमदार गोपीचंद पडळकर हा समजूतदार कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिले नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल. मात्र, त्यांचा अनादर व्यक्त करण्याचा पडळकर यांचा हेतू नव्हता, अस म्हणत पडळकर यांची बाजूसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी घेतली.

गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे. पण महाराष्ट्रात चाललंय काय? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याबद्दल कोणीही काहीही बोलतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना टोपण नाव ठेवले जातात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास केला. पण तुम्ही अग्रलेखात काय लिहिता? अग्रलेखाची तुमची भाषा काय असते? असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात, कारण त्याची जखम खूप दिवस असते. आमदार गोपीचंद पडळकर शब्द चुकला पण इतरांनी काहीही बोललेले चालते का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे सगळ्यांनीच राजकीय संस्कृती जपायला हवी असेही पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Jun 25, 2020, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.