कोल्हापूर - राज्यसरकारकडून आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. पाहिल्यांदाच कोणत्यातरी राज्य सरकारने आमच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. आम्ही केलेल्या मागण्या एकदम रास्त आहेत. वजनकाटे दुरुस्त करून ते ऑनलाइन करावेत. इथेनॉलला 5 रुपये वाढवून मिळावे. मागील वर्षाचे 200 रुपये मिळावे. यावर्षी एकरकमी एफआरपी मिळावी आणि हंगामाच्या शेवटी 350 रुपये अधिक मिळावे अशा प्रमुख मागण्या आहेत. संजय राऊत याच्या घरामध्ये साडेपाच लाख रुपये सापडले तर ईडी जागी झाली. मग काटेमारीतून 4500 कोटी शेतकऱ्यांचे लुटले जातात मग हे का दिसत नाहीत, असा सवाल शेट्टी यांनी केला.
सरकारला आम्ही जागे करण्यासाठी 25 नोव्हेंबरला राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकार आणि हे सरकार एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे ते म्हणाले. उद्यापासून जिथे जिथे मंत्री कार्यक्रमाला जातील तिथे शेतकरी जाब विचारायला पोहचतील असेही ते म्हणाले. आत्ता तुमचे सरकार 50 खोकी देवून आले आहे. पण नंतर 100 खोकी दिली तरी तुमचे सरकार शेतकरी येवू देणार नाहीत, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.