कोल्हापूर - पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. पथकाने कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पाहणी केली आहे. राजाराम बंधाऱ्यावरून पथक पुढे वडणगे, आंबेवाडी , चिखली गावातील पूरपरिस्थितीची करणार पाहणी करणार आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची शेती, जनावरे, घरे पुरामुळे सगळे उध्वस्त झाले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज जिल्ह्यात रवाना झाले आहे.