कोल्हापूर - पिसाळलेल्या मांजरीने आठ ते दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोखले गावात ही घटना घडली. मांजरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर कोडोली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू होते. असे असले तरी एका मांजरीने गावात चांगलीच दहशत माजवली असून सर्वत्र भीतीच वातावरण आहे. ( Cat Terror in panhala Village in kolhapur )
मांजरीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू - गावातील पाळीव मांजरीने मंगळवारी सायंकाळीपासून मराठी शाळेशेजारी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. सायंकाळी गावातील शेतात ये-जा करणाऱ्या महिला तसेच पुरुषांना पिसाळलेल्या या मांजरीने पाठीमागून येऊन पायाच्या पिंढरीचे लचके तोडले आहेत. रात्री पर्यंत सात जणांना चावा घेतला तर आज सकाळ पासून तिघांना पिसाळलेल्या मांजरीने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. तो मांजर ग्रामस्थांना चावा घेऊन शेत जमिनीत किंवा कोणाच्यातरी घरावर पळून जात असल्याने त्याला पकडणे अवघड झाले आहे. पिसाळलेल्या मांजरीने गावातील आठ ते दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री जखमी झालेल्या रुग्णांना कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर काहींना उपचाराठी दाखल करून घेण्यात आले आहे. या पिसाळलेल्या मांजरीचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान आज प्राणी मित्र व वन विभागच्या कर्मचाऱ्यांनी गावात येऊन पिसाळलेल्या मांजराची शोध मोहीम राबविण्यात आली आहे.
हेही वाचा - काँग्रेसचा आरोप- 'पोलीस पक्ष कार्यालयात घुसले', दिल्ली पोलिसांनी फेटाळला, आज देशभर आंदोलन