कोल्हापूर - चालत्या कारला आग लागून गाडीतील महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना आंबोली घाटात घडली. या घटनेत चालकाने कार पेटताच कारमधून उडी मारली. मात्र, त्याची पत्नी सीटबेल्ट बांधलेल्या अवस्थेत असल्याने ती कारमध्येच अडकली. यामध्ये ती पूर्णपणे जळाली असून तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
बेळगावहून सावंतवाडीकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुसऱ्या कारला धडक दिली. आपल्याला कोणी पकडू नये, या भीतीने चालकाने कार वेगाने पळवण्यास सुरुवात केली. पण काही वेळातच या भरधाव चालत्या कारने अचानक पेट घेतला. या वेळी, चालकाने कारमधून उडी मारली. पण त्याची पत्नी सीटबेल्ट बांधलेल्या अवस्थेत असल्याने ती कारमध्येच अडकली. यामध्ये ती पूर्णपणे जळाली असून तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
आंबोली घाटातील धबधब्यालगत ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त कार बेळगावातील असून यामध्ये कारचालकही किरकोळ जखमी झाला आहे.
हेही वाचा - पावसाची 'अव'कृपा : खरीप हंगामातील नुकसानानंतर रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून गेला
हेही वाचा - गांभीर्य नाहीच..! तरीही शहरात फिरत होते कोरोनाचे संशयित; आरोग्य विभागाची कारवाई