ETV Bharat / state

burning car : कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात 'बर्निंग कार', सुदैवाने जीवित हानी नाही

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरातील मुख्य रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास गाडीला आग लागली. यामध्ये गाडी जळून खाक (burning car) झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

burning car
बर्निंग कार
author img

By

Published : Nov 17, 2021, 10:13 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरातील मुख्य रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास गाडीला आग लागली. यामध्ये गाडी जळून खाक (burning car) झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बर्निंग कार

वाहन जळून खाक

दरम्यान, येथील टेंबलाईवाडी परिसरातील शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर एका चारचाकी गाडीने (burning car) पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. येथील स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काही क्षणातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवला. मात्र, गाडी जळून खाक झाली आहे. गाडी गॅसवर चालत असल्याचा संशय आल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.

हे ही वाचा - ... तर आपल्याला आगामी निवडणुकीत मतदान करता येणार नाही - मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.