ETV Bharat / state

Murder case : पूर्ववैमन्यसातून तरुणाचा शस्त्राने वार करत निर्घृण खून; घटनेनंतर हल्लेखोर पसार

author img

By

Published : Nov 14, 2022, 10:29 AM IST

पूर्व वैमन्यसातून कोल्हापुरातील टाकाळा खण परिसरात एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून खुनाची माहिती समजताच राजेंद्रनगरातील तरुणांनी आणि महिलांनी सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर मोठी गर्दी केली होती. ( case registered in Rajarampuri police station )

Gruesome murder by stabbing a weapon
शस्त्राने वार करत निर्घृण खून

कोल्हापूर : पूर्ववैमन्यसातून कोल्हापुरातील टाकाळा खण परिसरात एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली असून तीन ते चार जणांच्या टोळीने राजेंद्र नगर येथे राहणाऱ्या शाहूराज गायकवाड वय २२ या तरुणाचा खून धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. या खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून खुनाची माहिती समजताच राजेंद्रनगरातील तरुणांनी आणि महिलांनी सीपीआर रुग्णालयाच्या ( CPR Hospital ) अपघात विभागासमोर मोठी गर्दी केली होती. ( case registered in Rajarampuri police station )

वादाचे रूपांतर भांडणात : याबाबत अधिक माहिती अशी की, कुमार गायकवाड हा राजेंद्रनगरातील त्याचा मामा त्र्यंबक गवळी याच्याकडे राहत होता. काही महिन्यांपूर्वी कुमार याचा राजेंद्रनगर परिसरातील एका टोळीतील तरुणांशी वाद झाला होता. त्यावेळी याप्रकरणी कुमार याच्यावर राजारामपुरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र या भांडणाचा राग मनात धरून टोळीतील काहींनी कुमार वर लक्ष ठेवून होते. रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कुमार डी वाय पी मॉल जवळील पुलासमोर थांबला होता. काही वेळात तीन ते चार तरुण कुमारजवळ येत वाद घालू लागले आणि वादाचे रूपांतर भांडणात झाले.

अन्वेषण शाखेचे पथक रवाना : आपला जीव वाचवण्यासाठी कुमार टाकाळा खणीच्या दिशेने पळत सुटला मात्र त्याचवेळी तीन ते चार हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून धारदार शास्त्राने वार करत जखमी केले तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कुमार च्या कुटुंबीयांनी कुमारला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी सीपीआर रूग्णालय परिसरात नातेवाईक आणि महिलाची मोठी गर्दी झाली होती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला होता. दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी राजारामपुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना झाले, असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.