ETV Bharat / state

Library At Students Door : 'असंही एक ग्रंथालय'.. शाळेतल्या बंद कपाटातील पुस्तकं आता विद्यार्थ्यांच्या दारात.. - सोमवारपासून शाळा सुरु

कोरोनामुळे शाळा बंद ( Schools Closed Due To Corona ) आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. कोल्हापुरातल्या एका शाळेनं त्यांच्या कपाटात बंद असलेली पुस्तकं विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या दारात वाचण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला ( Schools Library At Students Door ) आहे. तर पाहुयात ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट..

पुस्तकं
पुस्तकं
author img

By

Published : Jan 22, 2022, 7:47 PM IST

कोल्हापूर : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा शिक्षण क्षेत्राला सुद्धा बसला आहे. दोन वर्षे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद झाल्या ( Schools Closed Due To Corona ) होत्या. मात्र, आधीच मुलं ऑनलाईन शिक्षणामुळे ( Online Education ) पुस्तकंपासून दुरावली आहेत. त्यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी कोल्हापूरातल्या चंदगड मधील एका शाळेने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शाळेतल्या बंद कपाटातील पुस्तकं आता विद्यार्थ्यांना त्यांच्या दारात विविध पुस्तकं वाचण्यासाठी मिळू लागली ( Schools Library At Students Door ) आहेत. काय आहे हा नेमका उपक्रम आणि कोणी सुरू केला आहे? पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्टमधून..

'असंही एक ग्रंथालय'.. शाळेतल्या बंद कपाटातील पुस्तकं आता विद्यार्थ्यांच्या दारात..

चंदगडमधील 'न्यु इंग्लिश स्कुल' शाळेचा उपक्रम

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे मुलांना पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंदचा निर्णय देण्यात आला. मात्र, सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार ( Schools Starting From Monday ) आहेत. मात्र, याच बंदच्या काळात कोल्हापूरतल्या चंदगड तालुक्यातील 'न्यु इंग्लिश स्कुल' ( New English School Chandgad ) या शाळेने एक अनोखा उपक्रम सुरू केला. शाळेच्या ग्रंथालयात एकूण पंधरा हजारहुन अधिक पुस्तके आहेत. शाळा बंद झाल्यामुळे ग्रंथालयातील पुस्तके पुन्हा कपाटबंद झाली. मात्र, या ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग मुलांसाठी व्हावा म्हणून प्राचार्य आर. आय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल शरद हदगल आणि उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी फिरते ग्रंथालय हा अनोखा उपक्रम राबविला. दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड हे तालुक्यातील मोठे विद्यालय आहे. आजूबाजूच्या अनेक गावातील मुले येथे शिक्षणासाठी येतात. मात्र, ऑनलाईनमुळे ही मुलं वाचनापासून दुरावू नयेत तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून, गावागावातील पारावर पुस्तके मांडून मुलांना त्यांना आवडतील अशी पुस्तकं वाचण्यासाठी दिली जात आहेत. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.

अनेक मुलं ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली गेममध्ये रमू लागली

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. उद्याचे भविष्यचं अंधारात असल्याने शिक्षण मंत्रालयाकडून सुद्धा विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये ऑनलाईन शिक्षण हा एक प्रमुख निर्णय होता. मात्र, अनेक वाड्या वस्त्यांवर नेटवर्कच्या अडचणींमुळे शिक्षण घेण्यासाठी अडथळे आहेत. तर ज्यांना याचा काहीही त्रास नाही त्यातले अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विविध गेम खेळण्यात रमू लागली आहेत. हळूहळू विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी सुद्धा कमी होऊ लागली आहे. हेच विद्यार्थी पुस्तकांपासून दुरावू नयेत म्हणून चंदगड मधल्या या शाळेने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

मुलांसोबत पालक सुद्धा पुस्तक घेऊ लागले

या उपक्रमाच्या माध्यमातून आठवड्यातून एक दिवस हे फिरते ग्रंथालय प्रत्येक गावात जाते. विद्यार्थी व पालक सुध्दा या फिरत्या ग्रंथालयातील पुस्तके घेऊन आवडीने वाचात आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या आवडीची पुस्तके त्यांना मिळावीत या उद्देशाने फिरते ग्रंथालय हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असे या शाळेचे अध्यापक संजय साबळे म्हणाले.

शाहूवाडी तालुक्यातही गेल्या वर्षीपासून 'शिक्षण आले दारी' उपक्रम

शाहूवाडी तालुक्यातील दशरथ आयरे, प्रकाश गाताडे, अमोल काळे, अनिल कांबळे आदी प्राथमिक शिक्षकांनी सुद्धा पहिल्या लॉकडाऊननंतर निर्बंध शिथिल झाल्यावर ज्या गावातील मुलं मोबाईल तसेच नेटवर्क अभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्या दारात जाऊन शिकविण्याचा उपक्रम राबवत आहेत. त्यांनी अजूनही हा उपक्रम सुरू ठेवला आहे. राज्यात सर्वात पहिला उपक्रम शाहुवाडी तालुक्यातील या शिक्षकांनी राबविला आहे. आता या शाळेने आपल्या शाळेतील ग्रंथालयाच्या कपटांची दारं मुलांसाठी उघडी केली असून, त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पुस्तकं दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचेही कौतुक होत आहे. शिवाय अशाच पद्धतीने त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवावा आणि मुलांमध्ये पुस्तकाची गोडी वाढवावी अशी पालकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.