कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र, अजूनही त्याची पूर्तता केली नाही म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दारातच झुणका भाकरी खात आंदोलन केले. शिवाय हे प्रातिनिधिक आंदोलन आहे. यापुढे शासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र संतापला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला. या आंदोलनासंदर्भातच अधिक माहिती दिली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
हेही वाचा - "शिक्षणाला महत्त्व नाही, पैशाला आहे"... अमरावतीत 'स्टिंग ऑपरेशन' व्हायरल!
अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा वणवा पेटेल -
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी अनेक संकटामुळे अडचणीत सापडले आहेत. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा सुद्धा आंदोलकांनी शासनाला दिला आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या -
1- शेतकऱ्यांना 2019 व 2020 मधील महापुरात नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत ते तत्काळ मिळावेत.
2- प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. त्याची पूर्तता व्हावी.
3- शासनाने वीजबिल माफीची दिलेल्या आश्वासनाची सुद्धा पूर्तता केली नाही. ती सुद्धा तत्काळ करण्यात यावी.
हेही वाचा - दिवाळी आली तरी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राध्यापक वेतनापासून वंचित