कोल्हापूर - चंद्रकांत पाटील यांची आज कोल्हापुरात पत्रकार परिषद ( Chandrakant Patil Press in Kolhapur ) झाली या पत्रकार परिषदेत त्यांनी महविकास आघाडीवर निशाणा साधला असून नवाब मलिक यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत. 23 फेब्रुवारीला ईडीने चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक केलं. मात्र नवाब यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब राजीनामा घेतील असं वाटलं होते. मात्र राजीनामा न घेता उलट त्यांची पाठराखण करत आहेत. दाऊद सारख्या व्यक्तीशी संबंध आल्यानंतर राजीनामा घेत नाही याचा अर्थ सरकार देखील त्यांना साथ देतंय असं दिसतंय अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजप गप्प बसणार नाही जो पर्यंत नवाब मलिक यांना उद्धव ठाकरे बोलवून राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील असे चंद्रकांत पाटील ( Chandkant Patil About Nawab Malik ) म्हणाले आहेत.
'...तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही'
1993 च्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण मुंबई उडवण्याचा प्रयत्न होता पण त्यात दाऊद यशस्वी झाला नाही. म्हणून ते विदेशात पळून गेले आणि त्यांच्या सोबतींबरोबर देश विरोधी काम करतच आहेत या सर्व कामात असणाऱ्या हसीना पारकरच्या संबधित जमीन दाऊद च्या योजनेनुसार नवाब मलिक यांनी घेतले असून हे सिद्ध झाले आहे.यामुळेच ईडीने कारवाई केलं मात्र भाजपवर आणि न्याय व्यवस्थेवर सगळे टीका का करतात हे कळत नाही.तर आता नवाब मालिकांच्या मुलाला देखील नोटीस गेली आहे त्याच्यावर देखील कारवाई होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बस्फोटानंतर मुंबई वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र आता त्यांचे चिरंजीव सत्तेसाठी नवाब मालिकांसारख्यांना साथ देत आहेत. त्यामुळे हे सगळे विषय नागरिकांच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच जो पर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
राजेंचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला तर तो आनंद क्षणभर -
मराठा आरक्षणासाठी विविध मागण्यासाठी संभाजी राजे छत्रपती हे उपोषणाला बसले होते संभाजीराजे यांना मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करावे लागते हे दुर्दैव असल्याचे चंद्रकांत पाटलांनी आज पत्रकार परिषदेत म्हणले यावेळी बोलताना ते म्हणाले देवेंद्र फडणवीस याने या मागण्या अगोदर मान्य केल्या होत्या त्या मागण्या दिसत करणे बंद केले आणि यासाठी संभाजीराजे यांना उपोषण करावे लागले आणि त्यानंतर महा विकास आघाडी सरकारने बंद केलेल्या योजना हा पुन्हा चालू करत काल मागण्या मान्य केल्याचे म्हणत आहेत. संभाजीराजेंनी यापूर्वी सरकारने किती वेळा तारखा दिल्या ते आठवा राजेंचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला तर तो आनंद क्षणभर आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे तसेच यापुढे ही आम्ही मराठा समाजाच्या मागण्यासाठी रस्त्यावर लढत राहू असे ते म्हणाले आहेत.
राजु शेट्टींना आंदोलन करावे लागत आहे हे योग्य नाही -
गेल्या आठ दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे दिवसा वीज मिळावी यासाठी आंदोलन करत आहेत मात्र आता हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपने देखील यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्याग्रह केले आंदोलन केली मात्र राजू शेट्टी ना देखील आंदोलन करावे लागत आहे हे दुर्दैव आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना थोडसं हिंसक वळण लागलेला आहे. मात्र ज्या गोष्टी सहज रित्या मान्य होऊ शकतात अशा गोष्टींना आंदोलन करण्याची वेळ महा विकास आघाडी सरकारने आणले आहे. वेळ पडल्यास भाजप देखील राजु शेट्टी यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.