ETV Bharat / state

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल - चंद्रकांत पाटील

धनंजय मुंडे हे संवेदनशील आहेत, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजेत. त्यांच्या पक्षाने त्यांना उठाबशा काढायला लावावे किंवा काहीही करायला लावावे. आरोप सिद्ध झाले नाहीत तर जरूर कारवाई करावी, पण मुंडे यांनी स्वतःच कबूल केले आहे त्याचे काय? असा सवाल पाटील यांनी केला.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Jan 13, 2021, 8:47 PM IST

कोल्हापूर - धनंजय मुंडे यांनी केलेली चूक कायद्याच्या चौकटीत बसत नाही. शरद पवार यांनी नेहमी नैतिकतेचे राजकारण केले आहे. मात्र, मुंडेचे हे काम नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, मुख्यमंत्री व पवार साहेबांनी त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोल्हापूर

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्याच्या राजकारणात कॅबिनेट मंत्र्यांचे एका महिलेसोबत संबंध होते, हे पहिल्यांदाच समोर आले आहे. हे आरोप कुणी केले नाहीत, हे त्यांनीच मान्य केले आहे. धनंजय मुंडे हे संवेदनशील आहेत, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजेत. त्यांच्या पक्षाने त्यांना उठाबशा काढायला लावावे किंवा काहीही करायला लावावे. आरोप सिद्ध झाले नाहीत तर जरूर कारवाई करावी, पण मुंडे यांनी स्वतःच कबूल केले आहे त्याचे काय? असा सवाल पाटील यांनी केला.

मुंडे यांना अटक झाली पाहिजे

विधानसभेच्या प्रतिज्ञापत्रात देखील त्यांनी याची माहिती दिली नाही. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणे हे चुकीचेच आहे. मुंडे यांनी घटनेच्या चौकटीत बसणारे काम केले नाही.
निवडणूक आयोग यावर नक्की कारवाई करेल, पण या अगोदर मुंडे यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कोरोनावरून देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने गरिबांना धान्य पुरवले. मात्र, काहीही न करता राज्य सरकार केंद्राकडे टीकेचे बोट दाखवत आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.