ETV Bharat / state

कोल्हापुरात रुजतेय 'बीजराखी'; पर्यावरण प्रेमींकडून राखीच्या माध्यमातून बीजप्रसार - बीजराखी बातमी

कोल्हापुरात काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत अशा काही राखी बनवल्या आहेत ज्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला बांधाव्या अशाच आहेत.  'बीजराखी', असे या राखीचे नाव असून कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ही संकल्पना पुढे आली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 18, 2021, 6:42 PM IST

Updated : Aug 18, 2021, 7:12 PM IST

कोल्हापूर - दरवर्षी प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी एखादी खास राखी बाजारात मिळते का पाहतच असते. अनेक राखी पाहून शेवटी एखादी पसंत पडलेली राखी घरी आणून रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाला बांधतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत अशा काही राखी बनवल्या आहेत ज्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला बांधाव्या अशाच आहेत. 'बीजराखी', असे या राखीचे नाव असून कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ही संकल्पना पुढे आली आहे.

कोल्हापुरात रुजतेय 'बीजराखी'

बीजप्रसार आणि बीजारोपणासाठी 'बीजराखी' संकल्पना आली पुढे

आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, वृक्षारोपण केले पाहिजे, याबाबत जनजागृती करून संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे, असे अनेकजण बोलत असतात. अनेकजण आपापल्यापरीने पर्यावरणासाठी काम करतानाही पाहायला मिळतात. कोल्हापुरातील 'वर्ल्ड फॉर नेचर'चे अभिजीत वाघमोडे सुद्धा गेल्या काही वर्षांपासून संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून यामध्ये काम करत आहेत. नुकतीच त्यांनी रक्षाबंधन निमित्त 'बीजराखी' ही संकल्पना पुढे आणली आहे. बीजप्रसार आणि बीजारोपणासाठी त्यांनी ही संकल्पना समोर आणली असून राखीला विविध फळांझाडांची तसेच वृक्षांच्या बिया लावण्यात आल्या आहेत. पर्यावरणाला घातक असणाऱ्या कोणत्याही घटकांचा यामध्ये उपयोग करण्यात आला नसून पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करून आकर्षक राखी बनविल्या आहेत. जेव्हा रक्षाबंधन असेल तेव्हा बहीण आपल्या भावाला ही 'बीजराखी' बांधले आणि रक्षाबंधननंतर राखी फेकून देण्याऐवजी हीच राखी आपल्या घराशेजारी किंवा कुंडीमध्ये ठेवता येईल. जेणेकरून आपोआपच बीजप्रसार तसेच बीजारोपण होईल, अशी ही संकल्पना आहे. अभिजित वाघमोडे यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य या राखी बनविण्यात व्यस्त असून रक्षाबंधनला वेळ कमी राहिल्याने या 'बीजराखी'चे किटही ते सर्वजण नागरिकांना वाटत आहेत.

बीजराखी सर्वांसाठी मोफत

खरंतर अनेकजण पर्यावरण प्रसार आणि संवर्धनासाठी झटत असताना पाहायला मिळतात. येथील अभिजित वाघमोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वजनच यासाठी मेहनत घेत आहेत. विशेष म्हणजे बीजप्रासार आणि बीजारोपणसाठी त्यांनी सर्वांना ही बीजराखी मोफत वाटली असून सध्या अनेक बीजराखीचे किट त्यांनी मोफत वाटायला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त राखीमुळे शहरात आणि एकूणच आपल्या पर्यावरणात फळांच्या झाडांसह काही मोठ्या वृक्षांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे याचे मोठे समाधान असणार असल्याचे अभिजित यांच्या बहीण स्वाती वाघमोडे तसेच पत्नी रोहिणी वाघमोडे यांनी म्हटले आहे.

राखीमध्ये वापरल्या 'या' झाडांच्या बिया

बीजराखी बनविण्यासाठी वाघमोडे यांनी कोणत्याही पद्धतीने पर्यावरणाला घातक असलेल्या वस्तूंचा वापर केला नाही. एक सुती धागा, आईस्क्रीमच्या काड्या, नैसर्गिक डिंक, कागदी स्ट्रॉ आदी गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. या रखीवर विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया आकर्षक पद्धतीने लावण्यात आल्या आहेत. यामध्ये रतनगुंज, काटेसावर, सीता अशोक, करंज, भोपळ्याच्या बिया, पपईच्या बिया, सीताफळ, बकुळीच्या बिया अशा तब्बल 20 प्रकारच्या बियांचा वापर करण्यात आला असल्याचे अभिजित यांची बहीण स्वाती वाघमोडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - कोल्हापूरकरांची चिंता वाढली; एकाच दिवशी आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

Last Updated : Aug 18, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.