ETV Bharat / state

'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' मोहिमेला मोठा प्रतिसाद; ५० स्वयंसेवी संस्थांचा सहभाग - Satej Patil News Kolhapur

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' या मोहिमेला आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात सुरवात झाली. यामध्ये कोल्हापुरातील 50 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

Khilemukta Zadache Kolhapur campaign
'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' मोहिमेला मोठा प्रतिसाद
author img

By

Published : Jan 3, 2021, 4:06 PM IST

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' या मोहिमेला आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात सुरवात झाली. यामध्ये कोल्हापुरातील 50 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

माहिती देताना पालकमंत्री सतेज पाटील

हेही वाचा - कोल्हापुरात गव्यांचा कळप कालव्यात पडला

शहरात ठिकठिकाणी जावून झाडांवरील खिळे काढून, झाडे खिळे मुक्त करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वत: अनेक ठिकाणी जावून झाडांवरील खिळे काढण्याबरोबरच, झाडांवर लटकविण्यात आलेले फलक काढत या मोहिमेत सहभाग घेतला. केवळ कोल्हापूरपुरती ही मोहीम मर्यादित न राहता राज्यभर अशा प्रकारची मोहीम लोकांनी हाती घेण्याचे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. या मोहिमेत आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरातील 1 लाख झाड घेणार मोकळा श्वास

काही दिवसांपासून शहरातील वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था झाडे खिळेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, एकाच वेळी सर्वच स्वयंसेवी संस्थांसह वृक्षप्रेमी संस्थांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकत्र करून कोल्हापुरातील सर्व झाडे खिळेमुक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी ताराराणी चौकात स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी एकत्र जमले. शहरात तब्बल 1 लाखाहून अधिक झाडांवर होर्डिंग्ज, जाहिराती अशा विविध प्रकारे खिळे मारण्यात आले आहेत. ती सर्व झाडे आज मोकळा श्वास घेणार आहेत.

मोहिमेत 50 स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

'झाडे लावा झाडे जगवा' असा संदेश देत असतानाच आहे ती झाडे जगविण्याकडे आपले नेहमीच दुर्लक्ष होत असते. झाडाला देखील संवेदना असतात, हे आपण विसरत असतो. त्यामुळे, अनेक वेळा झाडावर खिळे मारले जातात. तर, काही जण बिनधास्तपणे झाडावर आपले जाहिरातीचे फलक लावतात. परिणामी ही सर्व स्थिती लक्षात घेता, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून 'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' ही मोहीम हाती घेण्यात आली. या अभियानात कोल्हापुरातील विविध 50 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

झाडांना इजा पोहोचवणे कायद्याने गुन्हा; यापुढे दंडात्मक कारवाई होणार

दरम्यान, झाडांना इजा पोहोचवणे, त्याच्यावर खिळे मारणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे, यापुढे झाडावर खिळे मारणे अथवा बोर्ड लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील सतेज पाटील यांनी दिला. त्यासाठी महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या असून यापुढे झाडावर खिळे मारल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा - जय भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाचे गैरवर्तन; अर्धनग्न फिरत असल्याचा शिक्षकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.