ETV Bharat / state

हसन मुश्रीफांचं कोल्हापुरात वर्चस्व कायम; 'मिनी विधानसभा' निवडणुकीत सर्वच जागांवर मिळविला विजय - आमदार सतेज पाटील

Bidri Sugar Factory Election : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांना पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यास यश आलंय. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे जिल्ह्यातील राजकारणातील वर्चस्व कायम राहिले आहे.

Bidri Sugar Factory Election
Bidri Sugar Factory Election
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 7:06 AM IST

Updated : Dec 6, 2023, 12:17 PM IST

मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर Bidri Sugar Factory Election : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि के. पी. पाटील यांच्या सत्तारूढ आघाडीनं विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत 25-0 अशी एकहाती सत्ता मिळवलीय. निवडणुकीत परिवर्तन आघाडीकडून लढलेल्या अनेक मातब्बरांना पराभवाचा धक्का बसला. पराभूत उमेदवारांमध्ये जिल्हा बँकेच्या दोन मातब्बर संचालकांसह, बिद्रीचे विद्यमान व्हाईस चेअरमन, तीन विद्यमान संचालक आणि काही माजी संचालकांचाही समावेश आहे.

बिद्रीत केपीच भारी : राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील 218 गावांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि सर्वाधिक सभासद असलेल्या हा कारखाना आहे. या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि विद्यमान चेअरमन के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील तयार करण्यात आलेल्या सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील असलेली विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीमध्ये टक्कर होती. मात्र, कारखाना सभासदांनी सत्तारुढ आघाडीला भरभरून मतं देत विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हातात एकहाती सत्ता दिलीय. राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडेपाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव झालाय. विरोधकांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नसल्यानं बिद्रीत के. पी. पाटीलच भारी ठरले आहेत. सत्तारूढ पॅनल विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.

मिनी विधानसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधी आघाडीनं कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यात प्रचाराचा धुरळा उडविला होता. मंत्री, खासदार आणि आमदारांसाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. यामुळं या निवडणुकीला मिनी विधानसभादेखील म्हणत होते. यामुळं कारखान्याच्या निकालाकडं संपुर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील हे दोघे या निवडणुकीच्या निमित्तानं आमनेसामने उभे ठाकले होते. मुश्रीफांनी सत्ताधारी पॅनेलचं नेतृत्व केलं. तर मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी आघाडीनं ही निवडणूक लढविली. विरोधी गटाकडून बिद्रीमध्ये परिवर्तन करण्यासाठी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात देखील मोठ्या चुरशीनं 89.03 % मतदान पार पडल्यानं निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती.

नवीन चेहऱ्यांना सभासदांची पसंती : मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. राधानगरी तालुक्यातील 51, कागलमधील 48 आणि भुदरगडमधील 21 गावांतील मतमोजणी सुरू झाली. राधानगरी तालुक्यात विरोधी आघाडीला साडेतीन हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, याठिकाणी विरोधी आघाडीला मताधिक्क्य कमी मिळालं. याउलट कागल आणि भुदरगड तालुक्यात सत्ताधारी आघाडीला मोठं मताधिक्क्य मिळालं. यामुळं सुरुवातीपासून सत्ताधारी पॅनेल आघाडीवर राहिलं. सत्तारुढ आघाडीनं आपल्या पॅनलमध्ये केवळ 8 विद्यमान संचालकांना संधी दिली होती. तर 17 नवे चेहरे देण्याचं धाडस केलं होतं. सत्तारुढ आघाडीला या पॅनल रचनेचाही फायदा झाला असून नवीन चेहऱ्यांना सभासदांनी पसंती देत मोठ्या फरकानं निवडून दिलंय.

हेही वाचा :

  1. "कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्या", खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी
  2. Shahu Maharaj on Reservation : आरक्षण प्रश्नी सरकारने जनतेला झुलवत ठेवू नये; छत्रपती शाहू महाराजांनी टोचले सरकारचे कान

Last Updated : Dec 6, 2023, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.