ETV Bharat / state

Crisis On Ganesha Idol Artisans : कोल्हापुरातील गणेशमूर्ती कारागीर धास्तावले; नदीचे पाणी वाढत असल्याने मूर्ती स्थलांतराला सुरुवात

कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धोक्याचा इशारा लक्षात घेता बापट कॅम्प येथील गणेश मूर्ती कारागिरांनी तयार केलेल्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे मूर्ती कारागीर धास्तावले आहेत.

Crisis On Ganesha Idol Artisans
गणेशमूर्ती
author img

By

Published : Jul 22, 2023, 4:26 PM IST

गणेशमूर्ती कारागीर पूरपरिस्थितीतील त्याचे अनुभव सांगताना

कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षीच्या महापुराचा वाईट अनुभव विचारात घेऊन कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील गणेश मूर्ती कारागिरांनी तयार केलेल्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मूर्तींचा प्रश्न गंभीर बनत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता कुंभार बांधव करत आहेत. पंचगंगा नदी इशारा पातळीकडे प्रस्थान करत असल्याने कोल्हापुरातील गणेश मूर्ती कारागीर मात्र धास्तावले आहेत.

पूराचा फटका गणेशमूर्तींना : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरल्या आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पुराचा फटका सर्व सामान्यांबरोबरच अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवाची तयारी करणाऱ्या गणेश मूर्ती कारागिरांनाही बसणार आहे. 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे कोल्हापुरातील कुंभारांनी घडवलेल्या लाखो गणेश मूर्ती खराब झाल्याने कुंभारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा अनुभव पाठीशी असताना मूर्तिकारांनी पाणीपातळी वाढत असल्याचे पाहून तयार केलेल्या मूर्ती सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आता कोल्हापुरातील कुंभार बांधव करत आहेत.

बापट कॅम्प मधील कारागीर सतर्क : कोल्हापुरातील बापट कॅम्प येथे सुमारे पाच हजाराहून अधिक मूर्ती कारागीर आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असल्यामुळे गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बापट कॅम्पमधील गणेश मूर्ती कर्नाटकमधील बेळगावसह राज्यभरामध्ये विक्रीसाठी नेल्या जातात. या मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सध्या सुरू आहे; मात्र पावसाचा जोर वाढल्याने कुंभार बांधव सतर्क झाले आहेत.

प्रशासनाकडून सूचना : पंचगंगा नदी इशारा पातळीकडे प्रस्थान करत असल्यामुळे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बापट कॅम्प मधील मूर्तिकारागिरांनाही पाणी पातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून मिळाल्या आहेत. म्हणून आम्ही तयार झालेल्या गणेश मूर्ती स्थलांतरित करत आहोत, अशी माहिती मूर्ती कारागीर रमेश पाडळकर यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.