ETV Bharat / state

'आरोग्य सेतू’ ॲपमुळे समजले 596 कोल्हापूरकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात; 'त्या' सर्वांना दक्षतेचे संदेश - aarogya setu app news

कोल्हापूरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 596 जणांची माहिती आरोग्य ॲपमुळे मिळाली आहे. या सर्वांनाच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य काळजी घेण्याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत.

Arogya Setu app revealed 596 people who came in contact with covid-19 positive patient
'आरोग्य सेतू’ ॲपमुळे कोल्हापूरातील 596 जण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचे समजले; 'त्या' सर्वांना दक्षतेचे संदेश
author img

By

Published : Jun 10, 2020, 7:13 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात 'आरोग्य सेतू' या ॲपचा चांगलाच उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 596 जणांची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून या अ‌ॅपच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे संदेश, संपर्कात आलेल्या व्यक्तींना पाठविण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

Arogya Setu app revealed 596 people who came in contact with covid-19 positive patient
कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई...

भारत सरकारने कोव्हिड-19 संक्रमणाच्या संभाव्य जोखिमेबाबत कळविण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या काही सर्वोत्तम पध्दतीची माहिती देण्यासाठी आणि कोव्हिड-19 महामारीशी संबंधित काही वैद्यकीय सेवेची माहिती तसेच सल्ले देण्यासाठी आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप बनवले आहे. आरोग्य सेतू हे ॲप आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथील ज्या व्यक्तींच्या आपण संपर्कात येतो. त्या सर्वांचा तपशील रेकॉर्ड करण्यास (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) उपयोगी ठरते. जर त्यापैकी कोणाचेही कोव्हिड-19 पॉझिटिव्ह म्हणून निदान झाल्यास आपल्याला कळविले जाते. या ॲपच्या माध्यमातून वापरणाऱ्यांची स्थितीबद्दल माहिती दिली जात आहे. तसेच माध्यम विभागात विविध चित्रीकरणातून जनजागृतीही केली जाते. शिवाय कोव्हिड-19 बाबत राज्य निहाय अद्ययावत माहिती सुद्धा दिली जात आहे.

एवढेच नाही तर 'ई पास' बाबतही माहिती यावर दिली जाते. सद्यस्थितीत 12 कोटी 58 लाख भारतीय, हे ॲप वापरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे अ‌ॅप वापरणाऱ्यांची संख्या 3 लाख 6 हजार 869 इतकी आहे. जिल्ह्यातील 678 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 36 रुग्ण या ॲपचा वापर करत आहेत. तर 1 लाख 23 हजार 950 व्यक्तींनी या ॲपच्या माध्यमातून स्वत:ची माहिती अपडेट केली आहे.

एखाद्या व्यक्तीचे कोव्हिड पॉझिटिव्ह निदान झाले असेल तर चाचणी प्रयोगशाळा ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्याकडे शेअर करते. आयसीएमआर, ॲप्लीकेशन प्रोग्राम इंटरफेसमार्फत कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तींची यादी आरोग्य सेतू सर्व्हरवर शेअर करते. जर कोव्हिड 19 निदान झालेल्या व्यक्तीकडे आरोग्य सेतू ॲप इंन्स्टॉल केलेले असेल तर सर्व्हर ॲप स्टेटस अपडेट करते आणि या व्यक्तीसाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु करते. याच पद्धतीने कोल्हापूरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 596 जणांची माहिती या कनेक्शनच्या माध्यमातून या ॲपमुळे मिळाली आहे. या सर्वांनाच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य काळजी घेण्याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील एका हॅकरने आरोग्य सेतू ‌अ‌ॅपवरुन खासगी माहिती चोरी होत असल्याचा दावा केला होता. यावर आम्ही आमच्या सिस्टमची निरंतर तपासणी करत असतो. कोणताही डेटा किंवा सुरक्षेचे उल्लंघन झाले नसल्याचे आरोग्य सेतू टीमकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - कोल्हापूरातील 'त्या' रुग्णालयातील महिला रिसेप्शनिस्टलाही कोरोनाची लागण

हेही वाचा - करवीर तालुक्यात आशा सेविकेला मारहाण; ग्रामपंचयात सदस्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.