कोल्हापूर - कुडीत्रे येथे अपघात होऊन पंख तुटलेल्या घारीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पंखात पुन्हा जीव ओतण्याचे काम प्राणीमित्र गणेश कदम यांनी केले आहे. तब्बल तीन महिने उपचार करून या घारीला पुन्हा आकाशात सोडण्यात आले.
२८ नोव्हेंबर रोजी प्राणीमित्र गणेश कदम यांना कुडीत्रे येथे फोन आला. तिथे झालेल्या अपघातात एक घार जखमी अवस्थेत तडफडत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कदम हे तात्काळ त्याठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी घारीचा डाव्या पंख्याचे हाड तुटलेले निदर्शनास आले. त्यामुळे त्या घारीला आकाशात झेप घेण्यास अडथळा येत होता. कदम यांनी तात्काळ या घारीला वनविभागाचे डॉ. संतोष वाळवेकर यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले. त्यांनी पाहणी करत घारीवर उपचार करण्यास सुरुवात केली. तब्बल तीन तास उपचार करत तुटलेल्या हाडावर शस्त्रक्रिया केली. तुटलेल्या हाडात छोटा रॉड घालून ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तब्बल सलग तीन महिने या घारीवर उपचार सुरू होते. उपचारानंतर कदम यांनी या घारीला आपल्या घरी घेऊन गेले. तिची देखभाल करत तिचा सांभाळ केला. दर पंधरा दिवसांनी घारीला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असत. कदम हे दररोज या घारीकडून उडण्याचा सराव करून घेत असत. अखेर २० मार्च रोजी घारीचा पंखाना नवीन ऊर्जा मिळाली. तिचे पंख फडफडू लागले. पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर क्षणात घारीने आकाशात झेप घेतली. तीन महिने उपचार घेत असलेल्या घारीने मनसोक्त अवकाशात फेरफटका मारला व पुन्हा घार कदम यांच्या खांद्यावर येऊन बसली. त्यानंतर कदम यांनी या घारीला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. २५ मार्च रोजी रंकाळा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात या घारीला सोडण्यात आले.
हेही वाचा -शाररीक दिव्यांग तरीही, 'ती'ची कला पोहचलीये साता समुद्रापार