ETV Bharat / state

रविवारी अमित शाह यांची कोल्हापूरात जाहीर सभा - अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची रविवारी कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कळंबा परिसरातील तपोवन मैदानावर सकाळी 12 वाजता ही सभा होणार आहे.

अमित शाह
author img

By

Published : Oct 13, 2019, 4:12 AM IST

कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची रविवारी कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कळंबा परिसरातील तपोवन मैदानावर सकाळी 12 वाजता ही सभा होणार आहे.

उजळाईवाडी विमानतळावरून शहा आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही थेट सभेच्या ठिकाणी येणार आहेत. या सभेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार, घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर मैदान आणि परिसराभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिवाय या संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे. याठिकाणी दोन हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

Intro:अँकर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची उद्या कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कळंबा परिसरातील तपोवन मैदानावर सकाळी 12 वाजता ही सभा होणार आहे. उजळाईवाडी विमानतळावरून शहा आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही थेट सभेच्या ठिकाणी येणार आहेत. या सभेस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेसह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार, घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.Body:व्हीओ : सभेच्या पार्श्वभूमीवर मैदान आणि परिसराभोवती कडक असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षा कवच उभारले आहे. शिवाय या संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली आहे. पोलीस अधीक्षक आणि सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी करून बंदोबस्ताची आखणी केली आहे. दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय साध्या वेशातील पोलीस प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार आहेत. विशेष म्हणजे शहा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.