ETV Bharat / state

'कितीतरी पंतप्रधान येऊन गेले पण 370 कलम हटविण्याची ताकद मोदींमध्येच' - Amit shah on article 370

कितीतरी पंतप्रधान आले आणि गेले पण 370 कलम हटवण्याची ताकद नरेंद्र मोदी मध्येच होती आणि ते कलम त्यांनी हटवून दाखवले.  370 हटवले हे चांगले झाले असले तरी शरद पवार आणि राहुल गांधी आम्हाला प्रश्न विचारतात, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथे केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Oct 13, 2019, 6:43 PM IST

Updated : Oct 13, 2019, 7:47 PM IST

कोल्हापूर - कितीतरी पंतप्रधान आले आणि गेले पण 370 कलम हटवण्याची ताकद नरेंद्र मोदी मध्येच होती आणि ते कलम त्यांनी हटवून दाखवले. 370 हटवले हे चांगले झाले असले तरी शरद पवार आणि राहुल गांधी आम्हाला प्रश्न विचारतात. तिहेरी तलाक हटवला, यालाही त्यांचा विरोध आहे. काँग्रेसचा फक्त भाजपच्या कामाला विरोध असतो, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथे केली.

कोल्हापूर येथील महाजनादेश संकल्प सभेत बोलतना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा मोठा फटका बसला. पण केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही जिल्ह्यांना पुन्हा पूर्वीपेक्षाही चांगल्या पद्धतीने उभा करेल. तसेच कोल्हापूरमध्ये मोठा आयटीपार्क उभा करणार असे आश्वासन देत कोल्हापुरात भाजपने पासपोर्ट ऑफिस सुरू केले, कोल्हापूर कोकण रेल्वे जोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात सुद्धा भाजपनेच केली. तसेच कोल्हापूरकरांची टोलमुक्ती भाजपने केली असेही शाह यांना यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार उपक्रमाचे सुद्धा शाहांनी कौतुक केले.

हेही वाचा - हिम्मत असेल तर ३७० अन् तिहेरी तलाक मागे घेऊन दाखवा, मोदींचे विरोधकांना आव्हान

शरद पवार यांच्याकडे सत्ता होती तेव्हा पंधरा वर्षात महाराष्ट्राला त्यांनी काय दिले. केंद्रात दहा वर्षे सत्ता होती त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? असा प्रश्न उपस्थित करत पंधरा वर्षे आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राला अग्रेसर न बनवता त्यांनी अव्वल राज्याच्या क्रमवारीत महाराष्ट्राला खाली ढकलत 15 व्या स्थानावर नेल्याची टीका अमित शाह यांनी यावेळी केली.

हेही वाचा -'मोदीच काय ट्रम्प जरी परळीत आणला तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही'

Intro:कितीतरी पंतप्रधान आले आणि गेले पण 370 कलम हटवण्याची ताकत मोदी मध्येच होती आणि ते कलम त्यांनी हटवून दाखवलं

370 हटवले हे चांगलं झालं असले तरी शरद पवार आणि राहुल गांधी आम्हाला प्रश्न विचारतात

ट्रिपल तलाख हटवला यालाही त्यांचा विरोध आहे

काँग्रेसचा फक्त भाजपाच्या कामाला विरोध असतो

मोदींनी सर्जिकल स्ट्राइक केला

कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा मोठा फटका बसला पण केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही जिल्ह्यांना पुन्हा पूर्वीपेक्षाही चांगल्या पद्धतीने उभा करेल

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार उपक्रमाचे सुद्धा शहान कडून कौतुक

कोल्हापूरकरांची टोलमुक्ती भाजपने केली

कोल्हापूरमध्ये मोठा आयटीपार्क उभा करणार

महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने राज्याचा विकास केला

कोल्हापुरात पासपोर्ट ऑफिस सुरू केलं

कोल्हापूर कोकण रेल्वे जोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात सुद्धा भाजपनेच केली

कोल्हापूर चप्पल उद्योगाला चांगले दिवस येण्याचे काम भाजप सरकारने केले

शरद पवार यांच्याकडे सत्ता होती तेव्हा पंधरा वर्षात महाराष्ट्र ला त्यांनी काय दिलं केंद्रात दहा वर्षे सत्ता होती त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं?

पंधरा वर्षे आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राला अग्रेसर न बनवता त्यांनी अव्वल राज्याच्या क्रमवारीत महाराष्ट्राला खाली ढकलत 15 व्या स्थानावर नेले

Body:.

Conclusion:.
Last Updated : Oct 13, 2019, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.