ETV Bharat / state

नवरात्रौत्सव तिसरा दिवस : नागांना आशीर्वाद देणाऱ्या स्वरुपामध्ये अंबाबाईची पूजा - Ambabai Temple kolhapur

नाग मंडळी परिक्रमेला निघाली. जिथे-जिथे ज्या नागाचे दुष्टत्व गेले, तेथे त्या नागाचे तीर्थ निर्माण झाले. अखेरीला सर्व नाग जगदंबेच्या मंदिरात पोहोचले. तिथे देवीचे दर्शन घेऊन ते धन्य झाले. त्यांनी याप्रसंगी देवीची स्तुती केली. त्यात तिला सर्व सिद्धिप्रद स्तोत्र, असे नाव आहे. या स्तोत्रांमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि सिद्ध लक्ष्मी म्हणजे महासरस्वती यांची स्तुती आहे.

अंबाबाई
अंबाबाई
author img

By

Published : Oct 19, 2020, 8:20 PM IST

कोल्हापूर- आज शारदीय नवरात्रौत्सवाचा तिसरा दिवस आहे. आज अंबाबाईची नागांनी केलेल्या स्तुतीवर प्रसन्न होऊन आशिर्वाद देणाऱ्या स्वरुपामध्ये पूजा बांधण्यात आली.

पराशर यांच्या तपामध्ये प्रथम इंद्र देवाने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, महर्षींनी आपल्या संयमाने त्याच्यावर विजय मिळवला. नंतर पराशरांच्या उग्र तपाचा परिणाम ब्रह्मगिरीवर नाग लोकांना भोगावा लागला. त्या उष्णतेने त्रस्त होऊन नागांनी सर्वतीर्थातील जल शोषून घेतले. महर्षींनी गरुड अस्त्राने मंत्रून दर्भ नागांवर सोडले. त्यामुळे, विव्हळ झालेले सर्व नाग पराशर यांना शरण आले.

नागांना आशीर्वाद देणाऱ्या स्वरुपामध्ये अंबाबाईची पुजा

महर्षींनी नागांना क्षमा केली. नागांनी सर्व तीर्थ परत आणले आणि स्वतःचे असे नवीन नागतीर्थ निर्माण केले. आज या तीर्थाला पन्हाळ्यावर नागझरी म्हणून ओळखले जाते. नाग आणि पराशर यांची मैत्री झाली खरी पण नागांच्या विषयुक्त फुत्कारामुळे माता सत्यवती भयभीत झाली. तेव्हा तुम्ही मुके व्हा, असा शाप परशरांनी नागांना दिला. आपल्या कृतीचा पश्चाताप होऊन आपले स्वभाव दोष जाण्यासाठी नागांनी पराशरांना मार्ग विचारला. तेव्हा त्यांनी करवीर परिक्रमा करा, असे सांगितले.

नाग मंडळी परिक्रमेला निघाली. जिथे जिथे ज्या नागाचे दुष्टत्व गेले, तेथे त्या नागाचे तीर्थ निर्माण झाले. अखेरीला सर्व नाग जगदंबेच्या मंदिरात पोहोचले. तिथे देवीचे दर्शन घेऊन ते धन्य झाले. त्यांनी याप्रसंगी देवीची स्तुती केली. त्यात तिला सर्व सिद्धिप्रद स्तोत्र, असे नाव आहे. या स्तोत्रांमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि सिद्ध लक्ष्मी म्हणजे महासरस्वती यांची स्तुती आहे. त्यानंतर जगदंबेची अनेक प्रकारे स्तुती करून तिच्या १०८ नावांचे वर्णन आहे. या स्तोत्रांचा पाठ केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती आणि सर्व सिद्धी प्राप्त होतील, असे वरदान या स्तोत्राला आहे.

हेही वाचा- घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला नवरंगांमध्ये उजळले अंबाबाई मंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.