ETV Bharat / state

अंबाबाईचे मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले, शासनाच्या निर्णयाचे पूजाऱ्यांकडून स्वागत - अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी खुले कोल्हापूर

गेल्या आठ महिन्यांपासून करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र, आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज अंबाबाई मंदिर सुद्धा भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून, याचा भाविकांसोबतच मंदिरातील पूजाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Crowd of devotees at Ambabai temple
अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी खुले
author img

By

Published : Nov 16, 2020, 6:49 PM IST

कोल्हापूर - गेल्या आठ महिन्यांपासून करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र, आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज अंबाबाई मंदिर सुद्धा भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून, याचा भाविकांसोबतच मंदिरातील पूजाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने भक्त अंबाबाईला भेटण्यासाठी तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आतूर होते, त्याच पद्धतीने आई अंबाबाई सुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आतूर होती. अशी प्रतिक्रिया मंदिराचे पूजारी श्री मुनीश्वर यांनी व्यक्त केली आहे.

पूजाऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने राज्यातील सर्वच मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. आज मंदिरात जाऊन दर्शन घेता आले. तसेच श्रीच्या सेवेची संधी मिळाली, म्हणून पूजाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, आभार मानले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन भक्तांना अंबाबाईच्या मंदिरात आज सकाळपासून प्रवेश देण्यात येत आहे.

अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी खुले

देवीच्या मंदिरात सजावट

आज तब्बल 8 महिन्यांनंतर अंबाबाई मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मंदिराबाहेर भव्य रांगोळी काढण्यात आली होती. त्याच प्रमाणे मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. मंदिराच्या प्रत्येक दगडी खांबावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - आई आणि लेकराच्या भेटीसारखी माऊलींची भेट; वारक-यांनी केली भावना व्यक्त

हेही वाचा - देहू नगरीत तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांग

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.