ETV Bharat / state

Ajit Pawar Kolhapur Sabha : सभेत शेतकऱ्यांनी झळकवले बॅनर; तर अजित पवार यांचे भाषण सुरू असताना लोक उठून गेले

Ajit Pawar Kolhapur Sabha : कोल्हापूरमध्ये रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा पार पडली. या सभेमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) भाषणावेळी पोस्टरबाजी करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण (Ajit Pawar Speech In Kolhapur) सुरु असताना काही लोक उठून निघाल्यामुळं सभेत अनेक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या.

Ajit Pawar Kolhapur Sabha
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 7:56 AM IST

Updated : Sep 11, 2023, 1:00 PM IST

कोल्हापूर : Ajit Pawar Kolhapur Sabha : मी काय अतिरेकी नाही, मी काय गुंड नाही, मी एक शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायच्या आहेत, मला फक्त पाच मिनिटे द्या... अशा आशयाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेत शेतकऱ्यांनी झळकावले. मात्र, त्वरित पोलिसांनी हे पोस्टर ताब्यात घेतलं. तर अजित पवार (Deputy cm Ajit Pawar) यांचं भाषण सुरू असताना नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला.

अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांनी झळकावले बॅनर

शेतकऱ्यांनी झळकावले बॅनर : अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेसाठी शहरात पक्षाकडून फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आले होते. त्याची चर्चा तर संपूर्ण शहरात सुरू होती. मात्र, या फ्लेक्स आणि बॅनर व्यतिरिक्त सभेत एका शेतकऱ्याने फडकवलेल्या बॅनरची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाषणासाठी उभे राहताच प्रेक्षकांमध्ये बसलेले शेतकरी उभे राहिले आणि हातातील बॅनर उघडले. या फ्लेक्सवर शेतकऱ्यांनी 'मी काय अतिरेकी नाही, मी काय गुंड नाही, मी एक शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायची आहे. मला फक्त पाच मिनिटे द्या' असं लिहिलं होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बॅनर काढून घेतला. मात्र, मंत्र्यांकडे शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पाच मिनिटं नाहीत का? असा सवाल आता विचारला जातोय.

अजित पवार बोलत असताना नागरिक गेले उठून : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. यासाठी हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर सभास्थळी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. अगदी कोल्हापूरसह सांगली, सातारा येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक भाषण ऐकण्यासाठी आले होते. नेत्यांची भाषणं सुरू झाली. शेवटी अजित पवार हे बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र, दुपारपासून ताटकळत बसलेले नागरिक हे अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच उठून निघून गेले.

अजित पवारांचे जंगी स्वागत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा तपोवन मैदानात पार पडली. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दसरा चौकात निर्धार सभा पार पडली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून ही उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी या सभेची जोरदार तयारी केली होती. संपूर्ण शहरात फ्लेक्स आणि बॅनर लावत संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय केले होते. अजित पवार यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत मंत्री दिलीप वळसे पाटील (Minister Dilip Valse Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), सुनील तटकरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar News : उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना जमलं.. मुख्यमंत्री होण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठ विधान म्हणाले...
  2. Ajit Pawar Kolhapur Sabha : सत्तेत सामील होण्यासाठी आमच्यावर दबाव, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं ...
  3. NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी

Last Updated : Sep 11, 2023, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.