कोल्हापूर - मागील 6 महिन्यांपासून देशभरातील हॉटेल्स, बार पूर्णपणे बंद होती. मात्र ती आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायिकांतून आनंद व्यक्त होत असून कोल्हापूरातील एका मिसळ विक्रेत्याने आपल्या पहिल्या ग्राहकाचे हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोल्हापूरातसुद्धा कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या पार्सलला परवानगी असूनसुद्धा अनेक जण याकडे पाठ फिरवत होते. मात्र आता कोल्हापूरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच राज्य शासनाने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता सर्वच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नागरिक यायला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूरातल्या शिवाजी उद्यम नगर येथील सुप्रसिद्ध फडतरे यांची मिसळ खाण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. तेव्हा मालकाने आपल्या पहिल्या ग्राहकाचे हार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान, हॉटेल व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. तर अनेकांना आपल्या व्यवसाय बंद करावा लागला आहे. मात्र आता पुन्हा हॉटेल व्यवसायास परवानगी मिळाल्याने सर्वच व्यावसायिकांमधून आनंद व्यक्त होताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - यूपी सरकारची 'ही' हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही - सतेज पाटील
हेही वाचा - 'नॉनस्टॉप' आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी! स्वच्छता मोहिमेचे ७५ आठवडे पूर्ण