कोल्हापूर - मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी आलो नाही तर, विधानभवनावर भगवा फडकवण्यासाठी, नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आलो असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभांना सुरुवात केली.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना शेतकरी म्हणजे काय हेच माहीत नाही, शरद पवारांचा टोला
चंदगड मतदारसंघातील उमेदवार संग्राम कुपेकर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवारी) सभा घेतल्या. डॉ. मिणचेकर यांच्या प्रचारार्थ शिरोली आयोजित केलेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी दुष्काळ, प्रदूषण आणि बेरोजगार मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न बघतोय असे सांगितले. शिवाय मला सातबारा कोरा करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी मला ताकद द्या, असे आवाहनही केले. मी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी नव्हे तर, नवा महाराष्ट्र घडवायला आल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - भल्या भल्यांना पवारसाहेब कळले नाहीत, ईडीला कधी कळणार, धनंजय मुंडेंचा अमित शाहंना टोला