ETV Bharat / state

Kolhapur Crime : कोल्हापुरात भरदिवसा पाठलाग करून तरुणावर तलवार हल्ला - तरुणावर तपास तलवारीने वार

कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरासह शहरात खळबळ उडालीय.

Kolhapur Crime
Kolhapur Crime
author img

By

Published : May 31, 2023, 10:22 PM IST

Updated : May 31, 2023, 10:55 PM IST

कोल्हापूर : फुलेवाडी परिसरात राहणारा प्रकाश बबन बोडके असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या बोडके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून बोडके याचा या परिसरातील एका तरुणांच्या गटाशी वाद सुरू होता. याच वादातून आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवृत्ती चौकातील एका दुकानाजवळ प्रकाश बोडके थांबला होता. त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या तिघा तरुणांनी अचानक प्रकाश बोडके याच्यावर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. यानंतर प्रकाश बोडेके हा तिथून पळून जाऊ लागला. हल्लेखोरांनी प्रकाश बोडके याचा पाठलाग केला. दरम्यान जखमी अवस्थेत बोडके हा दौलतराव भोसले शाळेच्या समोरील एका खाजगी कार्यालयामध्ये जीव वाचवण्यासाठी शिरला. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून बोडके याच्यावर सपासप वार केले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

भरवस्तीत पाठलाग करून हल्ला - कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या शिवाजी पेठेत भर दिवसा पाठलाग करून तरुणावर हा हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन तरुणाचा पाठलाग केला. यावेळी उपस्थित नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भर दिवसा नागरी वस्तीत असा प्रकार घडल्याने याबाबतची चर्चा शहरात सुरू होती.

घटनास्थळी रक्ताचा सडा - हल्लेखोरांनी तरुणावर तपास तलवारीने वार केले. सुमारे आठ ते दहा वार हल्ल्यात जखमी झालेल्या बोडके याने हातावर झेलले. तलवारीचे घाव वर्मी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात बोडके हा पडला होता. तिघांनी तलवारीने वार केल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच बोडके याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. भरवस्तीत घडलेल्या तलवार हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून प्रथमदर्शनी तिघांनी हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. पोलीस योग्य तो तपास करत असून यासाठी परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेतला जात आहे लवकरच हल्लेखोरांना जेरबंद केले जाईल. असे सतीशकुमार गुरव, पोलीस निरीक्षक जुना राजवाडा यांनी सांगितले.

Last Updated : May 31, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.