कोल्हापूर - जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळत असते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे आली आहे. गावाचा घरफाळा आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांना चक्क सोन्याच्या दागिन्यांपासून भांडी आणि तिजोरी बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यासाठी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्य यांच्यासह अनेक दानशूर व्यक्त प्रायोजकत्व आहेत. पिराचीवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाची सद्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
पिराचीवाडी गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार -
कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावात नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. गावात अनेक विकासकामे सुद्धा झाली आहेत. सर्व सोयीनियुक्त ग्रामपंचायत इमारत पासून जिल्ह्यातील सर्वात सुंदर स्मशानभूमी म्हणून गावाला ओळखले जाते. गावातील या विकासकामांमुळे ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार सुद्धा भेटले आहेत. त्यातच आता शंभर टक्के घरफाळा आणि पाणीपट्टी वसूल व्हावी म्हणून अनोखी शक्कल लढविण्यात आली असून हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
काय आहे नेमका उपक्रम?
गावातील नागरिकांनी आपला घरफाळा आणि पाणीपट्टी येत्या 31 मार्च 2021 पूर्वी भरायची आहे. ज्यांनी घरफाळा आणि पाणीपट्टी भरली आहे आणि कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही त्यांनाच या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येणार आहे. यामध्ये विद्यमान सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना सहभागी होता येणार नाही. लकी ड्रॉ 13 एप्रिल रोजी गुढीपाडव्यादिवशी सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 21 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्यास 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, दुसऱ्या क्रमांकाला भांड्याचा सेट, तिसऱ्या क्रमांकाला तिजोरी आणि उत्तेजनार्थ म्हणून 19 पैठणी साड्या बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, काही सदस्य यांच्यासह दानशूर व्यक्तींनी बक्षीस जाहीर केली आहेत.
हेही वाचा - तांत्रिक व्यवस्था शक्य नसल्याने दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच - वर्षा गायकवाड
हेही वाचा -पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाख रुपये लुटणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; उल्हासनगरातून केली अटक