ETV Bharat / state

कोल्हापुरात सोमवारपासून 7 दिवस कडक लॉकडाऊन... - कोल्हापूरात सोमवारपासून लॉकडाऊन

दिवसेंदिवस कोल्हापुरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली. जिल्ह्यात सोमवारपासून (२० जुलै) कडक लॉकडाऊन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

7 days strict lockdown in Kolhapur from Monday
पालकमंत्री सतेज पाटील
author img

By

Published : Jul 17, 2020, 7:25 PM IST

Updated : Jul 18, 2020, 6:26 AM IST

कोल्हापूर - दिवसेंदिवस कोल्हापुरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली. जिल्ह्यात सोमवारपासून (२० जुलै) कडक लॉकडाउन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. केवळ औषध, दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 240 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

सतेज पाटील - पालकमंत्री, कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी समूह संसर्गाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्यापूर्वीच जिल्ह्यात लॉकडाऊन करावे, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केली. तर 650 कोरोनाबाधितांसाठी जिह्यातील 40 लाख लोकांचे विलगीकरण करणार काय? असा सवाल उपस्थित करत काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला.या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन करावे की नको, याबाबत दोन मतप्रवाह समोर आलेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपलब्ध आरोग्य यंत्रणा पाहता लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत अनेक नेत्यांनी मांडले. तर लॉकडाऊन काही कोरोना रुग्णांसाठी जिह्यातील सर्व जनतेचे विलगीकरण करणार काय ? असा सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला.

Last Updated : Jul 18, 2020, 6:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.