कोल्हापूर - सोमवारी एका दिवसात तब्बल 58 रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले. तर, दिवसभरात 5 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. एव्हढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दररोज नव्याने 40 ते 50 कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात घट झाली असून दिवसभरात फक्त 5 रुग्णांची वाढ झाली आहे.
कोल्हापुरात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 612 वर जाऊन पोहोचली आहे. असे असले तरी जिल्ह्यात 195 जणांवर आतापर्यंत उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 11 झाली आहे. कोल्हापूरातील शाहूवाडीतील रुग्णांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. आज (सोमवारी) सुद्धा दिवसभरात सापडलेल्या 5 रुग्णांपैकी 3 रुग्ण शाहूवाडी तालुक्यातील आहेत. शाहुवाडीत सध्या एकूण रुग्णांची संख्या 164 वर जाऊन पोहोचली आहे.
दरम्यान, दिवभरात एकूण 273 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर इतर सर्व अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. एकूण आकेवारीनुसार सर्वात कमी रुग्ण हातकणंगले आणि गगनबावडा मध्ये आहेत. तर कोल्हापूरात सुद्धा आतापर्यंत एकूण 21 रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत एकूण 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या :
1 वर्षांच्या आतील रुग्ण : 1
1 ते 10 वर्ष : 52
11 ते 20 वर्ष : 79
21 ते 50 वर्ष : 410
51 ते 70 वर्ष : 68
71 वर्षांवरील : 2
एकूण रुग्ण संख्या: 612