ETV Bharat / state

'महाराष्ट्रातून 'श्रमिक  रेल्वे'ने ७ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर स्वराज्यात, राज्य सरकारकडून ८५ कोटी खर्च' - कोल्हापूरहून परप्रांतिय रेल्वेने निघाले

5 ते 27 मे दरम्यान महाराष्ट्रातून ६२७ रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. या व्यवस्थेवर 85 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत 7 लाख मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

2 Shramik Special train gone from Kolhapur to uttar pradesh with migrated workers
कोल्हापूरातून 2660 मजूरांसह श्रमिक ट्रेन उत्तर प्रदेशला रवाना
author img

By

Published : May 19, 2020, 3:13 PM IST

Updated : May 30, 2020, 7:42 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने १ मे ते २७ मे २०२० पर्यंत देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांसाठी भारतीय रेल्वेच्या 'श्रमिक स्पेशल' गाड्याच्या ३५४३ फेऱ्या केल्या. या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील ४८ लाख श्रमिक प्रवाशांना त्यांच्या स्वराज्यात पोहोचवले.

hramik-special-train-
परप्रांतीय

केंद्र सरकारने केलेली व्यवस्था
रेल्वने गुजरात-९४६, महाराष्ट्र-६७७, पंजाब-३७७, उत्तर प्रदेश-२४३, आणि बिहार-२१५ श्रमिक स्पेशल ट्रेनस चालविल्या आहेत. यावेळी २२५ रेल्वेतील ७८ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था फ्रिमध्ये करण्यात आली. तसेच १.१० कोटी पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले.

विशेष श्रमिक रेल्वे या नियमित रेल्वे नव्हेत; आवश्यकतेनुसार त्यांच्या मार्गात बदल - यादव

कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या रेल्वे भलतीकडेच जात असल्याचा आरोप होत आहे. त्यावर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. आतापर्यंत सोडण्यात आलेल्या 3 हजार 840 विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांपैकी केवळ 4 गाड्यांनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी 72 तासांहून अधिक वेळ घेतल्याचे ते म्हणाले. 20 ते 24 मेदरम्यान काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे केवळ 1.85% रेल्वे गाड्या दुसरीकडे वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकृत माहितीनुसार, 36.5% विशेष श्रमिक रेल्वे गाड्या बिहारला, 42.2% उत्तर प्रदेशला पाठवण्यात आल्या. यामुळे या मार्गांवर मोठा ताण पडला. आतापर्यंत 52 लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. मागील आठवड्यात 1 हजार 524 रेल्वेंच्या माध्यमातून 20 लाख प्रवाशांना सोडले आहे. आता विशेष श्रमिक रेल्वेंची मागणी कमी होत असल्याचे यादव म्हणाले. सध्या आमच्याकडे 449 रेल्वेंची मागणी आली आहे, असे ते म्हणाले.

hramik-special-train-
रेल्वेत बसलेले श्रमिक

महाराष्ट्र सरकारने केलेली व्यवस्था
लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, प्रवासी, भक्त आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारच्या समन्वायने श्रमिक विशेष रेल्वेची सोय केली आहे. या रेल्वेमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानकातून नियोजन करुन लाखो मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविले आहे. 5 ते 23 मे दरम्यान 481 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. या व्यवस्थेवर 85 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत 6 ते 7 लाख मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या 32 हजार फेऱ्या झाल्या असून 3 लाख 80 हजार जणांना सोडण्यात आले आहे. यात देखील 75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २४ मे रोजी फेसबुक लाईव्हद्वारे दिली.

2 Shramik Special train gone from Kolhapur to uttar pradesh with migrated workers
कोल्हापूरहून उत्तर प्रदेशला जाताना मजूर...

३० मे रोजी श्रमिक विशेष रेल्वेने नांदेड येथून १४२० प्रवासी पश्चिम बंगालकडे रवाना..!

कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या १ हजार ४२० प्रवाशांना घेवून आज नांदेड येथून विशेष श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगालकडे रवाना झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवासी, यात्रेकरु, विद्यार्थी, मजूर यांना त्यांच्या मुळगावी परतता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करुन प्रत्येक तालुक्यातून प्रवाशांना एकत्र करण्यात आले

2 Shramik Special train gone from Kolhapur to uttar pradesh with migrated worker
परप्रांतीय मजूर

कोकण रेल्वेने आज २९ मेपर्यंत ६८ हजार ७५९ कामगारांना पोहोचवले घरी

रत्नागिरीतून लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यानंतर कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ हजार ७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे. या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५ हजार ६७७ परप्रांतीय कामगार आणि कुटुंबीयांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातून ८ तासांत ३ श्रमिक ट्रेन रवाना; उत्तर प्रदेशचे कामगार रवाना

कल्याण रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेशाला जाणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आठ तासांत तीन श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यामधील पहिली कल्याण ते भदोही (उ. प्र.) ही श्रमिक ट्रेन काल सायंकाळी ४ वाजता रवाना करण्यात आली होती. या श्रमिक ट्रेनमधून १७८८ मजूर रवाना झाले आहेत. त्या पाठोपाठ कल्याण ते जौनपूर (उ.प्र.) ही दुसरी श्रमिक ट्रेन सायंकाळी ६ वाजून १० मिनिटाने रवाना करण्यात आली आहे. या श्रमिक ट्रेन मध्ये १६५० प्रवासी होते. तर तिसरी श्रमिक ट्रेन कल्याण ते गोरखपूरसाठी (उ. प्र.) रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली. यातून १८५२ प्रवासी माघारी गेले. काल दिवसभरात ५ हजार २९० प्रवाशांना आपापल्या राज्यात सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल दुपारी उत्तर प्रदेशला जाणारी श्रमिक ट्रेन उशिरा धावल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र काही वेळातच पोलिसांनी या प्रवाशांची व्यवस्था कल्याण आणि विठ्ठलवाडी बस डेपोत केल्याने संभ्रम कमी झाला.

Shramik Special train
सोलापुरात बाळांतीणसाठी थांबलेली रेल्वे

२८ मे - नंदुरबारमधून दीड हजार परप्रांतीय मजूर, विद्यार्थी श्रमिक एक्स्प्रेसने गावाकडे रवाना

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या श्रमीक एक्स्प्रेसने त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. जामिरा संकुल येथील 1518 विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य 70 मजूर अशा 1588 प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले.

Shramik Special train
शिर्डी स्थानकावरील परप्रांतीय

साईनगर शिर्डी येथून श्रमिक रेल्वेने 1 हजार 104 कामगार व कुटुंबिय बिहारकडे रवाना.

शिर्डी(अहमदनगर)- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनमुळे बिहार राज्यातील कामगार जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकून पडले होते. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय शुक्रवारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.यामध्ये राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

Shramik Special train
शिर्डी स्थानकावरील परप्रांतीय

सिंधुदुर्गमधून झारखंडचे 1545 नागरिक श्रमिक रेल्वेने झाले रवाना

सिंधुदुर्गमध्ये लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याकरता सरकारने श्रमिक रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज २४ मेपर्यंत सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातील हातिया स्थानकाकडे विशेष श्रमिक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून 1 हजार 545 कामगार झारखंडकडे रवाना झाले.

संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून मजूर व कामगार यांना एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील 237 मजूर हे 12 बसमधून, मालवण येथील 491 मजूर हे 25 बसमधून, कुडाळमधील 372 मजूर हे 22 बसमधून, सावंतवाडी येथील 384 मजूर हे 19 बसधून, देवगडमधील 37 मजूर हे 2 बसेसमधून आणि वैभववाडी तालुक्यातील 24 जण एका बसमधून असे एकूण 81 बसमधून 1 हजार 545 मजूर सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले.

बिहारी कामगारांना घेऊन जाणारी रेल्वे निम्मी रिकामीच

परराज्यातील कामगारांना सोडण्यासाठी जालना जिल्ह्यातून आज बिहारकडे तिसरी श्रमिक रेल्वे रवाना झाली. शासन दरबारी एकूण तीन हजार आठ बिहारी नागरिकांची नोंद होती. त्यापैकी 1, 608 कामगार या रेल्वेने जाऊ शकतील, असे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र प्रत्यक्षात रेल्वे 859 म्हणजेच अर्धीच रेल्वे बिहारी कामगारांना घेऊन रवाना झाली आहे.

Shramik Special train
अमरावतीमधील रेल्वेतील दृश्य

पुण्यात अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक विशेष रेल्वेने जम्मू काश्मीरला रवाना

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला पाठपुरावा केला. त्यानंतर या अडकलेल्या लोकांना परतण्यासाठी परवानगी मिळाली. जम्मू काश्मीरचे 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने पुण्यातून रवाना झाले. पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिकांचा यात समावेश होता.

लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वे सोडण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक रेल्वेने जम्मू काश्मीरला रवाना झाले. जम्मू-काश्मीरचे 1हजार 27 विद्यार्थी आणि नागरिक पुण्यात अडकून पडले होते.

नाशिक प्रशासनाने 41 हजार परप्रांतीयांना रेल्वेसह बसने गावी पाठवले

नाशिकमधून आतापर्यंत 7 हजार 443 परप्रांतीयांना सहा ट्रेनच्या माध्यमातून तर 33 हजार नागरिकांना नाशिक येथून बसने गावी पाठवले आहे. मात्र, अजूनही नाशिकमधून हजारो परप्रांतीय नागरिकांनी गावी जाण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आहे. सर्वाधिक परप्रांतीय मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत.

hramik-special-train-
श्रमिकांसाठी पाणी बॉटल

नाशिक शहरात परराज्यात जाण्यासाठी मजूर, विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी पोलिसांना केलेल्या अर्जाची संख्या -

उत्तर प्रदेश 1042, मध्यप्रदेश -67, आसाम-10, पश्चिम बंगाल- 207, बिहार- 860, राजस्थान -10, छत्तीसगड -10, गुजरात -2, ओडिशा-87, उत्तराखंड-14, त्रिपुरा-9, दिल्ली-3, हिमालच प्रदेश-1, झारखंड-92, हरियाणा -1, कोलकाता-2, केरळ -1 एकूण 2437

कोल्हापूरातून 2660 मजूरांसह दोन 'श्रमिक ट्रेन' उत्तर प्रदेशला रवाना

जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजुरांना श्रमिक विशेष रेल्वेने घरी पाठवण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता आणि रात्री 10 वाजता जिल्ह्यातील एकूण 2660 मजुरांना घेवून दोन वेगवेगळ्या गाड्या उत्तर प्रदेशमधील बलियाकडे रवाना झाल्या.

सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, करविरच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. यावेळी शोभा राजमाने, प्रदिप झांबरे, सागर पाटील, कृष्णा धोत्रे, सुनील राजमाने, डॉ. महादेव नरके, विनायक सुर्यवंशी, प्रविण पाटील आदी जण उपस्थित होते. जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या एकूण 19 हजार 872 मजूरांपैकी सर्वाधिक 12 हजार 548 मजूर हे उत्तर प्रदेशचे आहेत. तर बिहारकडे 4 हजार 232, मध्य प्रदेशकडे 1066 आणि राजस्थानकडे 1477 मजूर पाठवण्यात आले आहेत.

hramik-special-train-
श्रमिकांसाठी पाणी बॉटल

हेही वाचा - कोल्हापूर शहर कोरोनामुक्त.. तीन रुग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यात अजूनही 22 कोरोनाबाधित

सोलापुरातून उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे रवाना; 1632 मजूर लखनऊला मार्गस्थ

सोलापूर रेल्वे स्थानकातून परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी दुसरी रेल्वे आज बुधवारी २१ मे रोजी दुपारी अडीच वाजता लखनऊकडे रवाना झाली. विशेष रेल्वेमध्ये 1 हजार 632 मजूर पाठवण्यात आले आहेत. पाठविण्यात येत असलेल्या कामगारांची तपासणी करूनच त्यांना रेल्वेमध्ये बसविण्यात आले. सर्व मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेल्वे खात्याकडे जमा करण्यात आले आहेत.

'व्हीआयपी'साठी नव्हे तर, चार महिन्यांच्या बाळासाठी थांबवली श्रमिक रेल्वे

सोलापूर - मागील 55 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेले परराज्यातील मजूर आपापल्या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. रेल्वेने 'श्रमिक विशेष रेल्वे'ची सोय उपलब्ध करून दिली. पण रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. यामुळे अवघ्या चार महिन्यांची बाळंतीण रेल्वे रूळावरूनच पायी चालत निघाली. त्यात विशेष ट्रेन सुटायची वेळ झाली होती. मात्र, गाडी पकडण्यासाठी बाळंतीण वेगात चालत येत असलेलं पाहून रेल्वे प्रशासनाने गाडी चक्क दहा मिनिटे थांबवली.

आज सोलापूरहून ग्वाल्हेरसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली. पण रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी वाहनाची कुठलीही सुविधा नव्हती. यामुळे एक चार महिन्याची बाळंतीण आपल्या तान्हुल्यासह रेल्वे रुळावरुन चालत निघाली. या महिलेच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी हे पळत-पळत येत होते. हे पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वे नियोजित वेळ होऊन आणखी १० मिनिटे जास्त थांबवली.ती महिला आपल्या चार महिन्यांच्या बाळासह रेल्वेमध्ये चढली आणि त्यानंतर रेल्वे निघाली. हा थरार एका चित्रपटाच्या कथेसारखाच ठरला. दरम्यान, आज सोलापूरवरून ग्वाल्हेरसाठी एकूण 1146 प्रवाशांना घेऊन रेल्वे रवाना झाली. रेल्वेतील प्रवाशांना शिदोरी म्हणून सोलापूरातील लक्ष्मी हायड्रोलिक या कंपनीकडून जेवणाची सुविधा करण्यात आली.

हेही वाचा - सीपीआर रुग्णालयाचा सावळा गोंधळ.. कोऱ्या कागदावर दिली जातेय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती, जिल्हा व्हेंटिलेटरवर

अमरावतीहून 'श्रमिक एक्सप्रेस' रवाना; बिहारमधील 568 कामगार आपल्या राज्यात परत

अमरावती विभागात अडकलेल्या कामगारांना स्वगृही सोडण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी रवाना झाली. ही एक्सप्रेस विनाथांबा असून बरौनीपर्यंत जाणार आहे. यात 24 डबे आहेत. अमरावती विभागातील 568 यावेळी रवाना झाले. यासोबत नागपूर रेल्वेस्थानकावरून नागपूर विभागातील सुमारे 700 कामगारांना या एक्सप्रेसमधून घरी पाठवण्यात येत आहे.

अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तरप्रदेशातील 1 हजार 544 कामगारांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस अमरावती रेल्वे स्थानकावरून उत्तरप्रदेशाकडे रवाना झाली. घरी परतण्याचा आनंद व्यक्त करत व ‘भारतमाता की जय’ची घोषणा करत कामगार बांधव आपल्या गावाकडे परतले.

अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा उत्तरप्रदेशातील देवरिया रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस 24 डब्यांची असून, त्यातून 1 हजार 544 प्रवासी नागरिक रवाना झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातून 500, अकोला जिल्ह्यातून 280, बुलडाणा जिल्ह्यातून 442, वाशिम जिल्ह्यातून 101 व यवतमाळ जिल्ह्यातील 221 प्रवासी, असे मिळून 1 हजार 44 प्रवासी रवाना झाले. यावेळी विभागीय आयुक्त सिंह व जिल्हाधिकारी नवाल यांनी प्रवाशांची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून व मास्कचा वापर ठेवून स्वत: सह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

hramik-special-train-
स्वराज्यात निघालेले श्रमिक

वसईतून उत्तर प्रदेशकडे तीन विशेष रेल्वे रवाना; आणखी रेल्वेसंख्या वाढवण्याची मागणी

पालघर जिल्ह्यातील वसई-विरारसह मीरा भाईंदर परिसरातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या चार हजार आठशे हजार श्रमिक प्रवाशांसाठी उत्तरप्रदेशला जाणाऱ्या तीन विशेष ट्रेन आज बुधवारी वसई रेल्वे स्थानकातून रवाना झाल्या. दोन जौनपूर आणि एक वाराणसीला रेल्वे जाणार आहे. त्यानुसार अर्ज केलेल्या प्रवाशांना वसई पश्चिमेकडील सनसिटी मैदानात जमण्याचे आवाहन केल्याने या मैदानात भर उन्हात हजारो प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

Last Updated : May 30, 2020, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.