कोल्हापूर - राज्याचे महसूल मंत्री व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 'गाव तेथे काँग्रेस'चा उपक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांशी जिल्हा काँग्रेस कमिटी येथे संवाद साधला.
यावेळी जिल्ह्यातील 1200 गावांमध्ये जवळपास 1500 ग्राम कमिट्या नेमणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, यावेळी काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल आणि सर्व सेलचे पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
-
काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष @bb_thorat यांच्या संकल्पनेतील 'गांव तिथे काँग्रेस' हा उपक्रम कोल्हापुर जिल्ह्यात राबविण्यासाठी आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकारी व सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. @INCMaharashtra pic.twitter.com/ZfaXJc3lym
— Satej (Bunty).D.Patil (@satejp) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष @bb_thorat यांच्या संकल्पनेतील 'गांव तिथे काँग्रेस' हा उपक्रम कोल्हापुर जिल्ह्यात राबविण्यासाठी आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकारी व सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. @INCMaharashtra pic.twitter.com/ZfaXJc3lym
— Satej (Bunty).D.Patil (@satejp) February 6, 2020काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष @bb_thorat यांच्या संकल्पनेतील 'गांव तिथे काँग्रेस' हा उपक्रम कोल्हापुर जिल्ह्यात राबविण्यासाठी आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकारी व सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. @INCMaharashtra pic.twitter.com/ZfaXJc3lym
— Satej (Bunty).D.Patil (@satejp) February 6, 2020
हेही वाचा - राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन