ETV Bharat / state

उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन - oxygen plant in kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्ह्यात पुरवला जात आहे. जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आज (मंगळवारी) घेण्यात आला.

kolhapur lockdown
kolhapur lockdown
author img

By

Published : May 4, 2021, 3:46 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आज (मंगळवारी) घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यात दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक पार पडली.

उद्या सकाळी 11 पासून 10 दिवस लॉकडाऊन

जिल्ह्यामध्ये सद्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची मागणी वाढेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या (बुधवार) 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सूट देऊन लॉकडाऊन कडकडीत करावा, अशी सूचना आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी केल्या. जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यात 2 हजार 400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत.

तातडीची बैठक

कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्ह्यात पुरवला जात आहे. जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.