जालना - जिल्ह्यातील जवखेडा येथील जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्याने चक्क पाण्यावर चालणारी सायकल तयार केली आहे. हिंगोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय 'इन्स्पायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनात' प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याने 'प्रथम' क्रमांक पटकाविला आहे. सुमेध संजय शिंगणे (वर्ग सहावी) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.
सायकल जमिनीवर ज्या पद्धतीने चालते, तशीच पाण्यावर देखील चालू शकेल का? या कल्पनेला सुमेधने मूर्त स्वरूप दिले आहे. त्यासाठी सुमेधने पत्रा, फॅन, बेरिंग, रबरी बूच, लोंखडी अँगल, रिकामे दोन जाँर, दोन थर्माकॉल, सायकल असे साहित्य वापरून आठ हजारात ही सायकल तयार केली आहे.
हेही वाचा... भाजपचा एल्गार : शेतकरी, महिला सुरक्षतेबाबत सरकार अपयशी; भाजपचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
अमरावती येथील होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनात या सायकची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच स्थरातून सुमेधचे कौतुक होत आहे. सुमेधला त्याचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. शिंगणे यांनी सायकल बनवण्यात मार्गदर्शन केले आहे.
राज्यस्तरीय प्रदर्शनात सायकची निवड झाल्यामुळे सुमेधचे शिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर, एकनाथ मगर, शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष संजय ठोंबरे, उपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे, केंद्र प्रमुख आर.पी. भाले, मुख्याध्यापक विठ्ठलराव घायाळ, भारत दांडेकर, शिल्पा जाधव, दयानंद घोरपडे, संतोष गजभिये, पांडूरंग मिसाळ, सतीश पडघान, निता कोंडके, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी ठोंबरे आदींनी अभिनंदन केले.