जालना - जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथील दोन तरुण आज दुपारी शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. या दोन्ही तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. गजानन रामलाल जोरले आणि कैलास आसाराम खरात अशी मृतांची नावे आहेत.
पीर पिंपळगाव शिवारात असलेल्या रवी प्रल्हाद कावळे यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. गजानन जोरले 32, हा कुंभार गल्ली येथील तर कैलास खरात 30 हा सोनल नगर येथील रहिवासी आहे.
हेही वाचा-पंढरपूर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी
चंदंजिरा पोलिसांनी तरुणांचे मृतदेह घराच्या बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
हेही वाचा-नागपुरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, ६० ठिकाणी बंदोबस्त