ETV Bharat / state

जालन्यात योग शिबिराचे आयोजन; प्रभारी पोलीस अधिक्षकांनी नोंदवला सहभाग - जालना योग भूमी परिवार योग शिबिर आयोजन

जालना शहरातील ज्वाला लॉन्स येथे पहाटे सहा ते आठ वाजेदरम्यान विनामूल्य प्राणायाम आणि योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पाच दिवसांपासून इथे सरावही सुरू होता.

yog camp organised on the occasion of yoga day
जालन्यात योग शिबिराचे आयोजन
author img

By

Published : Jun 21, 2021, 11:11 AM IST

Updated : Jun 21, 2021, 12:51 PM IST

जालना - जागतिक आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून योग भूमी परिवाराच्या वतीने विशेष प्राणायाम योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज (सोमवारी) पहाटे पार पडलेल्या या शिबिरामध्ये प्रभारी पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीही सहभाग घेतला.

याबाबत माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

कोविड वॉरिअर्सचा सत्कार -

जालना शहरातील ज्वाला लॉन्स येथे पहाटे सहा ते आठ वाजेदरम्यान विनामूल्य प्राणायाम आणि योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पाच दिवसांपासून इथे सरावही सुरू होता. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि उद्योगपती घनश्यामशेठ गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात कोरोना काळात विशेष काम केलेल्या आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्राणायाम आणि योगासने झाल्यानंतर विविध गाण्यांच्या तालावर विक्रांत देशमुख यांनीदेखील नृत्य केले. दरम्यान, कार्यक्रमानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी साधलेला संवाद

हेही वाचा - कोरोना महामारीत योग आशेचा किरण म्हणून सिद्ध - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाची परिस्थिती असतानाही सामाजिक अंतराचे भान ठेवत आज हा योगा दिन पाळण्यात आला. ठराविक चौकोनामध्ये साधकांनी योग केला.

covid warrior felicitation
कोविड वॉरिअर्सचा सत्कार

Last Updated : Jun 21, 2021, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.