ETV Bharat / state

जिल्हा परिषद सभागृहामध्ये महिलांनी उखाणे घेत लुटला संक्रांती-वाणाचा आनंद

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अयोध्या जयप्रकाश चव्हाण यांच्या वतीने या हळदी-कुंकवाचे आणि तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, महिला अधिकारी, महिला कर्मचारी अशा सर्वच विभागातील महिलांनी विशेष सहभाग नोंदविला. उखाणे, समूह नृत्य, गायन स्पर्धा, एकांकिका अशा विविध पैलूंच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या आनंदात भर घातली.

जालना जिल्हा परिषदेत संक्रांती पारंपरिक कार्यक्रम

author img

By

Published : Feb 4, 2021, 7:32 PM IST

जालना - जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभा, अधिकाऱ्यांची बैठक, असे चित्र दिसले नाही. सभागृहातून आज एक वेगळाच आनंद पाहायला ,ऐकायला आणि अनुभवायला मिळाला. निमित्त होते महिलांच्या संक्रांतीनिमित्तच्या हळदी-कुंकू आणि आणि तिळगुळाचे. त्यामुळे आज सभागृहांमध्ये फुलांचे सुगंध, हळदी-कुंकवाने भरलेले आणि आकर्षक सजावट केलेले ताट, एकमेकींना तिळगुळ आणि हळदीकुंकू देताना चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद दिसत होता.

जालना जिल्हा परिषदेत संक्रांती पारंपरिक कार्यक्रम

महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने आयोजन

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अयोध्या जयप्रकाश चव्हाण यांच्या वतीने या हळदी-कुंकवाचे आणि तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, महिला अधिकारी, महिला कर्मचारी अशा सर्वच विभागातील महिलांनी विशेष सहभाग नोंदविला. उखाणे, समूह नृत्य, गायन स्पर्धा, एकांकिका अशा विविध पैलूंच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या आनंदात भर घातली.

हेही वाचा - जन्मजात अंधत्व असणाऱ्या राहुलला परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज

हळदीकुंकवासाठी महिला जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थिती

अन्य वेळी फक्त सर्वसाधारण सभेसाठी जिल्हा परिषद कार्यालयात येणाऱ्या महिला सदस्य आज आवर्जून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आज त्यांच्यासोबत त्यांचे पती नव्हते.

जिल्हा परिषद सदस्यांमध्ये गंगासागर पिंगळे, शैला पालकर, रेणुका हणवते, अरुणा शिंदे, कृषी सभापती प्रभा गायकवाड, समाज कल्याण सभापती सहिदा परसुवले, नीतू पटेकर, अलका राठोड, यांच्यासह माजी महिला व बालकल्याण सभापती सुमन घुगे, यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांमध्ये जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करून दिली. महिला व बाल विकास अधिकारी संगीता लोंढे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, गटशिक्षणाधिकारी मंगल धुपे, भारती गेजगे, रंजना जाधव आदी महिला अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम दिवसभर पार पाडला.

पर्स आणि आनंद
महिला व बाल कल्याण सभापती कार्यालयाच्या वतीने उपस्थित महिलांना संक्रांतीची भेट म्हणून पर्स देण्यात आल्या. यासोबतच महिलांना या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात मुक्तपणे कलागुणांचे प्रदर्शन करता आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी 'मराठा संघर्ष यात्रा' पुण्यातून रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.