भोकरदन (जालना) - भोकरदन तालुक्यातील ठालेवाडी येथील विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक कारणावरुन हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पती तसेच सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यातील ठालेवाडी येथील विवाहितेस माहेरवरुन पैसे न आणल्यामुळे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा महिला छळाचा प्रकार पुढे आला आहे.
हेही वाचा -जळगावमधील सरकारी वकील रेखा राजपूत खूनप्रकरणी पतीला जन्मठेप