ETV Bharat / state

आम्ही कोणाला नोकरीवरुन काढत नाही, तेच सोडून जातात - केंद्रीय मंत्री धोत्रे

author img

By

Published : May 29, 2021, 11:24 AM IST

पोस्टामध्ये दरवर्षी विविध पदांची भरती होते आणि अनेकजण सोडूनही जातात, त्यांना आम्ही काढून टाकत नाहीत, ते स्वतः सोडून जातात. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री (इलेक्ट्रॉनिक माहिती व तंत्रज्ञान) संजय धोत्रे यांनी दिली आहे.

केंद्रिय मंत्री संजय धोत्रे
केंद्रिय मंत्री संजय धोत्रे

जालना - पोस्टामध्ये दरवर्षी विविध पदांची भरती होते आणि अनेकजण सोडूनही जातात, त्यांना आम्ही काढून टाकत नाही, ते स्वतः सोडून जातात. अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली आहे. पोस्ट विभागात कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे आणि तुटपुंज्या मानधनामुळे अवघ्या तीन-चार महिन्यातच ही पदे पुन्हा का रिक्त होतात? यामुळे इतर कर्मचार्‍यांवर याचा ताण पडतो. या प्रश्नाचे उत्तर देतांना ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री संजय धोत्रे

'मानधन कमी असले, तरी आयुष्यभर सुरू राहणारी नोकरी'

पोस्ट खात्यामध्ये दरवर्षी रिकाम्या जागा होतात आणि त्या भरल्या जातात. मात्र केवळ कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे आणि तुटपुंज्या मानधनामुळे अवघ्या तीन-चार महिन्यातच ही पदे पुन्हा रिक्त होतात. यामुळे इतर कर्मचार्‍यांवर याचा ताण पडतो. या प्रश्नाबद्दल बोलताना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले की, "ही परिस्थिती खरी आहे. मात्र आम्ही कोणालाही काढत नाहीत, आणि कोणी सोडून जात असेल तर त्यांना थांबवू शकत नाही. भरती होताना पूर्ण पारदर्शक भरती होते आणि केवळ दहावीच्या गुणवत्तेवर आधारित ही भरती असल्यामुळे अनेकांना यामुळे संधी मिळते. हे खरे आहे की लोक सोडून जातात, असे का होते? यावर देखील आम्ही विचार करत असल्याचेही स्पष्टीकरण धोत्रे यांनी दिले.

पोस्टाची नोकरी करत असताना इतर देखील चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये पोस्टाचा विमा एजंट ही एक महत्त्वाची संधी आहे. त्यासोबत तुम्ही तुमचा दुसरा व्यवसाय करून देखील ही नोकरी करु शकतात. त्यामुळे मानधन जरी कमी असले, तरी आयुष्यभर सुरू राहणारी नोकरी आहे. त्यामुळे रिकामे न राहता काहिनाकाहीतरी केले पाहिजे, अशा व्यक्तींसाठी देखील ही एक संधी आहे. असेही केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - छत्रपती संभाजीराजेंनी आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा देऊ नये - नारायण राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.