ETV Bharat / state

जालन्यात १६ दिवसांपासून पाणीटंचाई; पाण्याच्या सुरक्षेचा खर्च पाण्यात

जालन्यात ८ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर आला. त्यानंतर बाराव्या दिवशी उद्या पाणी येईल म्हणत १६ दिवसांवर गेला. त्यामुळे झाले एकरांवर आता कोणी पाणी देता का पाणी म्हणत रानोमाळ हिंडण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

author img

By

Published : Apr 27, 2019, 10:43 AM IST

जालन्यात १६ दिवसांपासून पाणीटंचाई

जालना - येथील नगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार आता हळूहळू पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून उघड होऊ लागला आहे. मागील १६ दिवसांपासून जालनाकरांना पाणी मिळाले नाही. त्याचसोबत शहरात असलेली टँकर लॉबी ही सक्रिय झाली आहे. त्यामुळे कर लॉबीला मदत करण्यासाठीच नगरपालिकेने टंचाई निर्माण केली नाही ना? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

जलवाहिनी फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया

जालन्यात ८ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर आला. त्यानंतर बाराव्या दिवशी उद्या पाणी येईल म्हणत १६ दिवसांवर गेला. त्यामुळे झाले एकरांवर आता कोणी पाणी देता का पाणी म्हणत रानोमाळ हिंडण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

जालना शहराला पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सुमारे १०० किलोमीटर लांबून येणाऱ्या पाणी पुरवठामध्ये अंबड शहराला देखील पाणी दिले जाते. त्यात जलवाहिनीच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी जलवाहिनीला छिद्र पाडून पाणी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेने खर्च करून अंबड ते जालना वाहिनीच्या सुरक्षेसाठी ६ कर्मचारी गस्त घालण्यासाठी तैनात केले आहेत. असे असतानादेखील याठिकाणी जलवाहिनी फोडून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे सुरक्षा पथक काय करते? असा प्रश्नही जालनाकर विचारत आहेत.

मात्र, पाण्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सुरक्षा पथकाचा खर्च पाण्यात जात आहे. शुक्रवारी (२६ एप्रिल) अंबड पाचोड रोडवरील चिंचखेड येथे वाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले. नियोजित केलेल्या एखादे कारंजेदेखील एवढे उंच उडणार नाही, एवढे या पाण्याचे फवारे आकाशात झेप घेत होते. तर या व्हॉल्वच्या बाजूला तलावच केला आहे, अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. केवळ जालना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी असूनही जालनाकरांना पाण्यासाठी १६ दिवस भटकावे लागत आहे.

Intro:पाण्याच्या सुरक्षेचा खर्च पाण्यात
जालना शहराला सोळा दिवसापासून निर्जळी

जालना नगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार आता हळूहळू पाणीपुरवठा च्या माध्यमातून उघड होऊ लागला आहे .गेल्या सोळा दिवसापासून जालनेकरांना पाणी मिळाले नाही, आठ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा दिवस झाला नंतर बारा दिवस झाला आणि बाराव्या दिवशी उद्या पाणी येईल म्हणत म्हणत सोळा दिवसांवर गेला. त्यामुळे झालं एकरांवर आता कोणी पाणी देता का पाणी म्हणत रानोमाळ हिंडण्याची वेळ आली आहे. त्याच सोबत जालना शहरात असलेली टॅंकर लॉबी ही सक्रिय झाले आहे. त्यामुळे कर लॉबीला मदत करण्यासाठीच नगरपालिकेने टंचाई निर्माण केली नाही ना? प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
जालना शहराला पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून पुरवठा करण्यात येतो . सुमारे शंभर किलोमीटर लांबूनघे येणाऱ्या पाणीपुरवठा मध्ये अंबड शहराला देखील पाणी दिले जाते. जलवाहिनीच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी जलवाहिनीला छिद्र पाडून। पाणी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेने खर्च करून अंबड ते जालना वाहिनीच्या सुरक्षेसाठी सहा कर्मचारी गस्त घालण्यासाठी तैनात केले आहेत. असे असतानादेखील ठिकाणी जलवाहिनी फोडून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे सुरक्षा पथक काय करते ?असा प्रश्नही जालनेकर विचारत आहेत. मात्र पाण्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले केलेल्या सुरक्षा पथकाचा खर्च पाण्यात जात आहे .काल शुक्रवार दिनांक 26 रोजी अंबड पाचोड रोडवर चिंचखेड येथे वाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले .नियोजित केलेल्या एखादे कारंज देखील एवढे उंच उडणार नाही एवढे या पाण्याचे फवारे आकाशात झेप घेत होते .या व्हॉल्वच्या बाजूला तलावात केला आहे अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. केवळ जालना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शून्य कारभारामुळे पाणी असूनही जालनेकरांना सोळा दिवस भटकावे लागत आहे. Body:सोबत व्हिजवलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.