ETV Bharat / state

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग; जीवित हानी नाही - पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये 15 वाहने जळून खाक झाली.

Vehicles seized by the police caught fire in Jalna
पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग; जीवित हानी नाही
author img

By

Published : Mar 4, 2021, 8:17 PM IST

Updated : Mar 4, 2021, 9:10 PM IST

जालना - पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या चार चाकी वाहनांना आज दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सुमारे 15 वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग; जीवित हानी नाही

जुन्या कदीम जालना पोलिस ठाण्यातील घटना -

कचोरी रोडवर जुने कदीम जालना पोलिस ठाणे आहे. वर्षभरापूर्वी हे पोलीस ठाणे क्रीडा संकुलाच्या बाजूला नवीन इमारतीत गेले आहे. पोलीस ठाणे स्थलांतरित झाल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी देखील जुन्या पोलिस ठाण्यातून नवीन पोलीस ठाण्यात स्थलांतरित करण्यात आल्या. मात्र, चार चाकी वाहने इथेच पडून होती. या वाहनांना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. वर्षानुवर्षे पडून असलेली ही वाहने आणि त्यातच दुपारच्या उन्हाची वेळ त्यामुळे क्षणार्धातच या वाहनांनी पेट घेतला. वाहनांच्या टायर मुळे धुराचे प्रचंड लोळ उडू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंब पाणी वापरून ही आग आटोक्यात आणली .

वीस वर्षापूर्वीची वाहने -

पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने, वाहन मालकाने सोडवून न घेतल्यामुळे या परिसरात तशीच पडून होती. गेल्या पंचवीस वर्षांपासून या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. या वाहनांमध्ये छोटा हत्ती, मारुती व्हॅन, ऑटो रिक्षा, जीप, कार अशा विविध वाहनांचा समावेश आहे. याच वाहनांच्या बाजूला वर्षभरापूर्वी जप्त केलेली वाहने देखील होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे ही वाहने बचावली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करण्यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ लहामगे यांनीदेखील शर्तीचे प्रयत्न केले. घटनास्थळाला नायब तहसीलदार शितल बंडगर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

नावा रोडवर देखील आग -

जालना पासून काही अंतरावर असलेल्या नाव्हा रोडवरील दत्ताश्रमच्या बाजूला आग लागली होती. या परिसरात मोठे जंगल आहे आणि या जंगलांमध्ये झाडांचा पडलेला पालापाचोळा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

Last Updated : Mar 4, 2021, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.