ETV Bharat / state

सरकारचा दबाव आणून नितेश राणेंवर गुन्हे दाखल, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास - केंद्रीय मंत्री दानवे - लसीकरण सक्ती रावसाहेब दानवे प्रतिक्रिया

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve comment on nitesh rane bail plea ) यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एन.डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र, गिरणी कामगार यांच्यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला, असे दानवे म्हणाले.

Raosaheb Danve comment on nitesh rane bail plea
नितेश राणे जामीन रावसाहेब दानवे प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 17, 2022, 5:58 PM IST

जालना - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एन.डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र, गिरणी कामगार यांच्यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला. त्यामुळे, त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

हेही वाचा - लसीकरणाची वर्षपूर्ती, ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण - आरोग्य मंत्री राजेश टोपे

सरकारचा दबाव आणून नितेश राणेंवर गुन्हे दाखल

आज नितेश राणे ( Raosaheb Danve comment on nitesh rane bail plea ) यांना न्यायालयाने जामीन नाकारला. यावर देखील दानवे यांनी भाष्य केले. न्यायालयावर आमचा विश्वास असून त्यांचा जामीन नाकारला असला तरी, अजून त्यांना अपील करण्यासाठी संधी आहे. सरकारचा दबाव आणून नितेश राणेंवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयाकडून नक्कीच जामीन मिळेल, असा विश्वास दानवे ( Raosaheb Danve comment on nitesh rane ) यांनी व्यक्त केला.

मोठ्या प्रमाणात जनजागृतीमुळे लसीकरण सक्तीची गरज नाही

लसीकरणाबद्दल आता लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झाल्याने लसीकरण सक्तीची गरज राहिली नाही, असेही दानवे म्हणाले. केंद्राने राज्याला कधीही लसी पुरवण्यात हात आखडला नसून मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा केल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्याने केंद्रावर आरोप करताना वस्तुस्थिती जाणून घेऊन आरोप करावे, असेही दानवे यांनी म्हटले.

त्या भेटीकडे राजकीय हेतूने बघणे चुकीचे

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. सत्तार हे माझ्या लोकसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी असून त्यांच्या कामासाठी ते माझ्याकडे आले होते. या भेटीकडे राजकीय हेतूने बघणे चुकीचे असल्याचे दानवे म्हणाले.

हेही वाचा - नऊ दिवसांपूर्वी अंत्यविधी झालेला व्यक्ती घरी परतला.. जालना जिल्ह्यातील घटना

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.