ETV Bharat / state

जालना-औरंगाबाद हायवेवर अपघात; दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Oct 17, 2020, 7:02 AM IST

जालना-औरंगाबाद हायवेवर विनोदराय कंपनीसमोर विचित्र अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या एका जणास कारने उडवल्याने तो जागीच ठार झाला. तर या कारमध्ये प्रवास करणारा एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे.

Accident on Jalna-Aurangabad highway
जालना-औरंगाबाद हायवे रस्त्यावर अपघात

जालना (बदनापूर)- जालना-औरंगाबाद हायवेवर विनोदराय कंपनीसमोर विचित्र अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या एका जणास कारने उडवल्याने तो जागीच ठार झाला. तर या कारमध्ये प्रवास करणारा एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे.

जालना औरंगाबाद महामार्गावर विनोदराय कारखान्यासमोर एक ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे त्या ट्रकचा क्लिनर जॅक घेऊन महामार्ग ओलांडत असतानाच दुसऱ्या बाजूने एक कार आली. या कारला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने जॅक नेणाऱ्या व्यक्तीस उडवले. त्यात तो ठार झाला तर त्यानंतर कारही उलटली या अपघातात कारमधील एक जण ठार झाला.

हेही वाचा-चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन, नंतर असे घडले नाट्य...

प्रमोद लक्ष्मण पवार (वय ३०) रा. आदर्शनगर कुदळ, अलिबाग व सुनील भगवान चंदवावगे (वय ४०) रा. वळणी, जि. भंडारा असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. अपघात होताच दोघांनाही सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे सामान्य रूग्णालयाचे डॉ. अंभोरे यांनी सांगितले. याबाबत बदनापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहपोलिस उपनिरीक्षक शेख इब्राहिम हे अधिक तपास करत असल्याचे पोलीस अंमलदार नरवडे यांनी कळवले आहे.

हेही वाचा-मुंबई कोरोना अपडेट : 1644 रुग्णांची महामारीवर मात; नवे आढळले 1823 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.