ETV Bharat / state

जालना : बायपास रस्त्यावर दोन बस व ट्रकचा विचित्र अपघात, प्रवासी किरकोळ जखमी - Two bus and truck accident in Jalna city

जालना शहरातील बायपास रस्त्यावर कन्हैया नगर येथे दोन बस आणि एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.

दोन बस एक ट्रकचा अपघात प्रवासी किरकोळ जखमी
author img

By

Published : Nov 12, 2019, 12:27 PM IST

जालना - शहरातून नागपूरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर कन्हैयानगर येथे सकाळी नऊच्या सुमारास दोन बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. बसला मागून येणाऱ्या साखरेच्या ट्रकने धडक दिल्यामुळे बस समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या बसवर जाऊन आदळली. अपघातामध्ये बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर, धडक दिलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात गेला.

दोन बस एक ट्रकचा अपघात प्रवासी किरकोळ जखमी

सकाळी दहाच्या सुमारास औरंगाबाद नागपूर आणि औरंगाबाद चांदूर बाजार या दोन बसेस जालना बस स्थानकातून निघाल्या. शहराच्या बाहेर पडतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. साखरेचा ट्रक चांदूरबाजार बसवर आणि चांदूरबाजारची बस नागपूर बसवर आदळली. या अपघातात चांदूरबाजार बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. नागपूर बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले. या प्रकरणाचा तपास आणि पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Intro:जालना शहरातून नागपूरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर कन्हैया नगर येथे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला पाठीमागून येणाऱ्या साखरेच्या ट्रकने समोरच्या बसला ठोस दिल्यामुळे ती बस तिच्या समोर असलेल्या आणखी एका बसवर आदळली अपघातामध्ये मधल्या बच्चे प्रवासी जखमी झाले आहेत आणि साखरेचा ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेला आहे

Body:सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद नागपूर आणि औरंगाबाद चांदूर बाजार या दोन बस जालना बस स्थानकातून निघाल्या आणि शहराच्या बाहेर पडताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला गतिरोधक आवरून गॅस सिलेंडरचा ट्रक जात होता त्यामुळे या सिलेंडर च्या पाठीमागे असलेल्या औरंगाबाद नागपूर या बस चालकाने ब्रेक मारले त्यापाठोपाठ असलेल्या औरंगाबाद चांदूरबाजार या बस चालकांनाही ब्रेक मारले आणि त्या पाठोपाठ असलेल्या तीर्थपुरी येथून सागर सहकारी साखर कारखान्यातून साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक ने ब्रेक मारल्यामुळे हा अपघात झाला साखरेचा ट्रक चांदूरबाजार बस वर आणि चांदूरबाजार ची बस नागपुर परस्वर या अपघातात चांदूरबाजार बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत तसेच नागपूर बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून देण्यात आले आहे पुढील कारवाई पोलिस करीत आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.