जालना - परतुर येथील उद्योजक राजेश नहार यांची 11 जानेवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 2 आरोपींना अटक केली आहे. रघुवीरसिंग चंदूसिंग टाक आणि अरविंद उर्फ बाळू अर्जुन भदर्गे (रा. आंबा तालुका परतुर) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - आपत्ती व्यवस्थापनात जीवित अन् वित्तहानी बचावाचे धडे
11 जानेवारीला रात्री साडेदहा वाजेण्याच्या सुमारास जालना-मंठा रोडवर शिंगाडे पोखरी पाटीजवळ नहार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. यासाठी 3 पथकेही यावर काम करत होती.
हेही वाचा - पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघे आले परत, तिसऱ्याचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या गुन्हेगाराचा शोध घेत असताना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार परतुर येथील रघुवीरसिंग चंदूसिंग टाक आणि अरविंद उर्फ बाळू अर्जुन भदर्गे यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना मौजपुरी पोलीस ठाण्यात हजर करून त्यांची चौकशी करण्यात आली. तर त्यांना आज (बुधवारी) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.