ETV Bharat / state

विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोप - जालना क्राइम

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे ते काल रात्री तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. याला कारणीभूत वीज वितरण कंपनी असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

three young brothers died in well
विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोप
author img

By

Published : Nov 19, 2020, 7:39 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे ते काल रात्री तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. याला कारणीभूत वीज वितरण कंपनी असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

विहीर दुर्घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोष; नातेवाईकांचा आरोप
ज्ञानेश्वर (वय- 24) परमेश्वर(वय - 20) आणि सुनील(वय - 18) अशा तीन सख्ख्या भावांचा एकाच विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. पहाटेपासूनच पळसखेडा पिंपळे या गावाकडे ग्रामस्थांनी धाव घेतली. या भावांचा मृत्यू विहिरीत पडून झाला असला, तरीही हा घातपात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या घातपाताला कारणीभूत वीज वितरण कंपनीच आहे, असा दावा नातेवाईकांनी केलाय.

वीज वितरण कंपनी दिवसा वीज न देता रात्री पुरवठा करते. यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतामध्ये फिरावे लागते. काल देखील अशाच प्रकारे या मुलांना विजेचा झटका लागून ते विहिरीत पडल्याची शंका मृतांचे नातेवाईक ज्ञानेश्वर जाधव यांनी केला आहे. रात्री ही दुर्घटना घडल्यानंतर आज सकाळी 11 वाजता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक रुग्णालयाकडे पाठवले आहेत. ज्या विहिरीत या तिघांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर जाधव परिवाराचे घर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.