ETV Bharat / state

जालन्यात तीन दिवसांची कडक संचारबंदी; शहरांतून परतणाऱ्या नागरिकांमुळे संख्येत भर

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे ही संख्या वाढत असल्याचे समोर आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

corona in jalna
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
author img

By

Published : May 29, 2020, 2:23 PM IST

जालना - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे ही संख्या वाढत असल्याचे समोर आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
21 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम तीन दिवसांची जिल्हाबंदी जाहीर केली. यानंतर जिल्ह्यात संचारबंदी कायम होती. मात्र तिसऱ्या टप्प्यात नियमांमध्ये शिथिलता दिल्याने कामानिमित्त जिल्ह्याबाहेर असण्या व्यक्ती परतत आहेत. यामध्ये मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गुरुवारी एकाच दिवशी 31 रुग्णांची भर पडली. आज हा आकडा 117 वर जाऊन पोहोचलाय. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय.

संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य आहेत. खतं, बी-बियाणे आणि औषधे या महत्त्वाच्या दुकानांव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद आहेत. शहरातील बाधितांच्या आकड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने तातडीची पावले उचलली असून बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्यातची प्रक्रिया सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.