ETV Bharat / state

भोकरदनमध्ये तीन नव्या कोरोना रुग्णांची नोंद, परिसर सील - भोकरदनमध्ये नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कुरेशी मोहल्ल्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा २० वर्षीय मुलगा तसेच खासगी दवाखान्यातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील एक महिला नांजा येथील आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषद , पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाने तात्काळ शहरातील जुना तहसील परिसर तसेच नांजा येथील परिसर सील केला आहे.

corona cases in bhokardan
भोकरदनमध्ये तीन नव्या कोरोना रुग्णांची नोंद
author img

By

Published : Jun 16, 2020, 5:17 PM IST

जालना - मंगळवारी भोकरदन शहरातील दोन तर नांजा येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरातील एका व्यक्तीचा कोरोना अवहाल तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर सदर परिसर तसेच शहरातील दोन खासगी दवाखाने सील करण्यात आले होते. या पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक तसेच सील केलेल्या एका दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी अशा एकूण आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील तीन जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कुरेशी मोहल्ल्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा २० वर्षीय मुलगा तसेच खासगी दवाखान्यातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील एक महिला नांजा येथील आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषद , पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाने तात्काळ शहरातील जुना तहसील परिसर तसेच नांजा येथील परिसर सील केला आहे. भोकरदन शहरात याअगोदर एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, गेल्या चार दिवसात तीन रुग्ण आढळल्याने शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात व्यापारी महासंघातर्फे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

नांजा गावातील सदर महिला राहात असलेला परिसर सील केला असून तिच्या घरातील तिघांना क्वारंटाईन केले आहे. परिसरातील पंचवीस घरातील नागरिकांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, विस्तार अधिकारी उदयसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक यांनी परिसराला भेट देऊन काही सूचना केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.